पश्चिम महाराष्ट्र

तब्बल ३५ वर्षांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात झळकल्या प्रतिमा...

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या कार्यकालाचा आज समारोप झाला. सात दिवसांची मुदत घेऊन आयोजित करण्यात आलेल्या आजच्या सभेला जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवल्याने सभा होऊ शकली नाही; परंतु राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आज छोटेखानी समारोपाचा कार्यक्रम झाला.

जुन्या सुमारे ३५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका ठरावाचा आधार घेत आज पालिकेच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचे तैलचित्र लावण्यात आले तसेच नगरसेवक प्रदीप लोहार यांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याही तैलचित्राचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नगरसेवक आनंदराव पवार, नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार यांच्यासह मुख्याधिकारी वैभव साबळे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सभागृहातील सर्वच दिवंगत नगराध्यक्ष यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सभागृहात समारोपाचे भाषण केले. पाच वर्षांच्या कार्यकाळात मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्रज्ञा पवार आणि वैभव साबळे या तिघांच्यासह पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांची चांगलीच साथ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हे शहर राज्यात सर्वोत्तम शहर म्हणून झळकावे, येत्या काळात राजकारणविरहित विकास पावणारे शहर अशी वेगळी ओळख शहराची निर्माण व्हावी तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे व वसंतदादा या दिग्गजांच्या उंचीला साजेसे कार्य या सभागृहात घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्याधिकारी वैभव साबळे म्हणाले, "समारोपाचा कार्यक्रम घेण्याची जबाबदारी प्रशासनाची होती; परंतु काही कारणांनी अडथळे आले. लवकरच प्रशासन अशा पद्धतीचा एक उपक्रम घेईल. शेवटच्या क्षणी कमी कालावधीत ताकदीच्या, प्रगल्भ माणसांसोबत काम करता आल्याचे समाधान मिळाले."

परत सभागृहात येणार नाही!

  • या पाच वर्षात चांगले काम केल्याचे समाधान व्यक्त करत 'माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांचे पुन्हा सभागृहात येणे होईल; परंतु मी येणार नाही' असे विधान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्या भाषणात केले.

  • समारोपाच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष आघाडीचे सर्वच नगरसेवक गैरहजर राहिले. याशिवाय सत्ताधारी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व पक्षप्रतोद यांच्यासह काही नगरसेवकांनीही या सभेकडे पाठ फिरवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

SCROLL FOR NEXT