Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : धक्कादायक! पतीच्या निधनानंतर पत्नीनं घेतला गळफास, आत्महत्येमुळं परिसरात खळबळ

पतीच्या निधनानंतर केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात उडाली खळबळ

सकाळ डिजिटल टीम

पती राजेंद्र बरगाले हे आजाराने त्रस्त होते. त्यात त्यांचा दोन दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्का अंजनी यांना सहन झाला नाही.

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे पतीच्या निधनानंतर पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अंजनी राजेंद्र बरगाले (वय ४५, रा. सीताफळे मळा, कवलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत ग्रामीण पोलिस (Sangli Police) ठाण्यात नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, की मृत अंजनी बरगाले यांचे पती राजेंद्र बरगाले हे आजाराने त्रस्त होते. त्यात त्यांचा दोन दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्का अंजनी यांना सहन झाला नाही. त्यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नातेवाइकांनी दरवाजा वाजवला. त्यानंतर दरवाजा फोडून काढल्यानंतर ही दुर्दैवी उघडकीस आली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पतीच्या निधनानंतर केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या वतीने जरांगेंशी चर्चा करणारे राजेंद्र साबळे कोण? कसे बनले OSD?

'मी आदेशसोबत पळून जाऊन लग्न केलं त्यावेळी १८ वर्षाचे होते' सुचित्रा बांदेकर म्हणाल्या...'तो काहीच कमवत नव्हता, आणि...'

Latest Maharashtra News Updates: हुजूर साहिब नांदेड ते मुंबई, पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

भारताची चंद्राकांक्षा! 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकारणार; चांद्रयान-6,7,8 चा प्लॅन तयार

Vaishno Devi Landslide : वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळली; अर्धकुंवारीजवळ शेकडो भाविक अडकल्याची शक्यता...बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT