Pregnant Women esakal
पश्चिम महाराष्ट्र

शेतजमिनीचा वाद टोकाला अन् गर्भवतीला झोळीतून न्यायची आली वेळ; मिरजेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना

आरग येथील गावाबाहेर असणाऱ्या लोकवस्तीत असणाऱ्या कुटुंबीयांचा रस्ता वहिवाटीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

सर्वांनी महिलेला झोळीत टाकून झाडाझुडपातून, ओढ्यातून वाट काढीत रुग्णवाहिकेपर्यंत नेले.

आरग : शेतजमिनीच्या बांधरस्त्याचा वाद इतका टोकाला गेला की, एका गर्भवतीला (Pregnant Women) रुग्णालयात दाखल करण्यासाठी रस्ता मिळाला नाही! एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे तिला झोळीत टाकून न्यावे लागले. झाडाझुडपातून, ओढ्यातून वाट काढत ग्रामस्थांना रुग्णवाहिकेपर्यंत जावे लागले. माणुसकीला काळिमा लावणारा हा प्रकार येथील रेल्वे स्टेशन (Railway Station) रस्त्यावरील माळी मळ्यात घडला.

आरग येथील गावाबाहेर असणाऱ्या लोकवस्तीत असणाऱ्या कुटुंबीयांचा रस्ता वहिवाटीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. सुमारे ४० एकरांच्या डागाचा हा प्रश्‍न आहे. संबंधित शेतकऱ्याने वहिवाटीत असणारा रस्ता बांध घालून बंद केला. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांचा वाद तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या कोर्टात सुरू आहे. अनेकवेळा सुनावणी होऊनही रस्त्याचा निर्णय प्रलंबित आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गर्भवती अस्वस्थच होती. आज तीव्र वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. तेव्हा माळी कुटुंबीयांनी मंडल अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. गर्भवतीची सुटका करण्याची विनंती केली. तहसीलदारांशी चर्चा सुरू असताना इकडे प्रसूतिवेदना वाढत होत्या. शेवटी रस्ताच मिळत नसल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. सर्वांनी महिलेला झोळीत टाकून झाडाझुडपातून, ओढ्यातून वाट काढीत रुग्णवाहिकेपर्यंत नेले.

गेली दोन वर्षे हा वाद महसूल विभागाकडे प्रलंबित आहे. ऊस नेण्यापासून प्रत्येक वेळी या शेतकऱ्यांची अडवणूक होते. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या उसासाठी मंडल अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तात्पुरता रस्ता उपलब्ध करून दिला होता. आज मात्र तशी मध्यस्थी होऊ शकली नाही.

‘स्थळ पाहणी पंचनामा झाला असून, याआधी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देऊन शेतमाल बाहेर काढण्यात आला आहे. या कामी मंडल अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले होते. सध्या याविषयची सुनावणी सुरू असून, लवकरच योग्य तो निर्णय होईल.’

-डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार, मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT