Mahapalika Nagar
Mahapalika Nagar 
पश्चिम महाराष्ट्र

वकील सर्वसामान्यांना लुटतात, आपल्यालाही कशावरून लुटत नसतील, तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

नगर ः महापालिकेतील वकिलांचा संपूर्ण पॅनलच आज महापालिकेच्या स्थायी समितीने रद्द केला. वकिलांच्या पुढील पॅनल निवडीचे अधिकार स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांच्याकडे देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार सभापती आलेल्या अर्जांचा विचार व चर्चा विनिमय करून निर्णय घेणार आहेत. नवीन पॅनलमध्ये 50 टक्‍के महिलांना स्थान देण्याची सूचनाही सदस्यांनी मांडली. त्यामुळे महापालिकेच्या वकिलांच्या नवीन पॅनलमध्ये महिलांची संख्या वाढणार आहे. सध्याच्या वकिलांच्या पॅनलमुळे 44 टक्‍के निकाल महापालिकेच्या विरोधात गेले आहेत. 

महापालिकेत आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, योगीराज गाडे, आशा कराळे, सोनाली चितळे, सुभाष लोंढे, सुप्रिया जाधव, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी, मुख्य लेखा परीक्षक चंद्राकांत खरात, प्रवीण मानकर, अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे आदी उपस्थित होते. 

सभेत महापालिकेतील वकिलांच्या पॅनलवरील वकिलांचे प्रगती पुस्तक मांडताच सुभाष लोंढे यांनी महापालिकेतील न्यायालयाची प्रकरणे पाहणारा विभाग प्रमुख कोण आहे. नेमलेल्या पॅनलचा प्रमुख कोण आहे, त्यांना कामे कशी वाटून दिली जातात? असे प्रश्‍न उपस्थित केले. याला गणेश भोसले यांनी दुजोरा दिला. यावर महापालिका प्रशासनाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. 

भोसले यांनी महापालिकेतील नगररचना विभागाकडून टीडीआरसाठी ठराविक वकिलाकडेच पाठविले जाते. तो वकील 14 हजार रुपये शुल्क घेतो व तेच काम दुसरे वकील केवळ दोन हजार 700 रुपयांतच करून देतात. नगररचना विभागातील कामे ठराविक वकिलांनाच का मिळतात. महापालिकेतील वकील सर्वसामान्यांना लुटतात मग इतरांना व महापालिकेला लूटत नसतील हे कशावरून. त्यासाठी महापालिकेच्या वकिलांच्या पॅनलवर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप गणेश भोसले यांनी केला. 

योगीराज गाडे यांनी महापालिकेतील वकिलांच्या पॅनलवर वकिलांच्या नियुक्‍तीसाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या नियमांतच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. गाडे व लोंढे यांनी वकिलांचा नवीन पॅनलच नियुक्‍त करण्याची शिफारस केली तर गणेश भोसले यांनी नवीन पॅनलमध्ये 50 टक्‍के महिला वकील नेमाव्यात अशी सूचना केली. आलेल्या अर्जांत केवळ स्वाती वाघ यांचाच अर्ज होता. त्यामुळे संपूर्ण पॅनल रद्द करत नवीन पॅनल निवडण्याचे सभेत ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT