all records are broken by onion  
पश्चिम महाराष्ट्र

कांद्याने मोडले सारे विक्रम! 

सकाळ वृत्तसेवा

नगर : राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील भावाच्या तुलनेत राहुरी बाजार समितीत कांद्याने क्विंटलला 21 हजार रुपयांचा भाव घेऊन आज सर्व विक्रम मोडले. राहुरीत आज गावरान कांद्याच्या 25 गोण्यांना सुमारे 21 हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला. राज्यात कोणत्याही बाजार समितीत कांद्याला एवढा भाव मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : याची देही, याची डोळा.. उपग्रहाचा सोहळा! 

जिल्ह्यातील राहुरी, राहाता, पारनेर या बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे लिलाव झाले. त्यात गावरान व लाल कांद्याच्या नऊ हजार 768 गोण्यांची आवक झाली. त्यात राहात्यातील 570, पारनेरमधील 5892, राहुरीतील 3296 गोण्यांचा समावेश होता. राहुरीत दोन नंबरच्या गावरान कांद्याला आणि एक नंबरच्या नव्या लाल कांद्यालाही 14 हजार 500च्या पुढे भाव मिळाला. गोल्टी कांदाही दहा हजारांपर्यंत भाव खाऊन गेला. राहात्यात जुन्या कांद्याला क्विंटलला 15 हजारांपुढे, तर पारनेर येथे लाल कांद्याला 13 हजारांपुढे भाव मिळाला. 

ठरावीक गोण्यांनाच मिळतोय भाव 
कांद्याला भाव चांगला मिळत असला, तरी शेतकऱ्यांनी कांदा परिपक्व झाल्यानंतरच त्याची काढणी करून बाजारात आणणे गरजेचे आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या ठरावीक गोण्यांनाच भाव मिळत आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कांद्याची एकदम जास्त आवक झाली, तर त्याचा भावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढणीनंतर टप्प्याटप्प्याने विक्री करावा, असे आवाहन कांदाउत्पादक शेतकऱ्यांमधून केले जात आहे. 

आता कांद्याच्या रोपांची चोरी 

श्रीरामपूर :  काही दिवसांपासून कांद्याचे दर वधारल्यामुळे कांदा गोण्या चोरीच्या घटना घडत असतानाच, आता कांद्याच्या रोपांचीही चोरी होऊ लागली आहे. तालुक्‍यातील माळवाडगाव शिवारातून चोरट्यांनी एक गुंठा क्षेत्रातील कांदा रोपे काल (गुरुवारी) रात्री चोरून नेली. अल्ताफ पठाण (रा. अशोकनगर फाटा) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.  सध्या कांद्याला चांगला दर मिळत असून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांदा चर्चेचा मुद्दा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्‍यात चाळीतील 40 कांदा गोण्या चोरीचा डाव शेतकऱ्यांच्या जागरूकतेने उधळला.

कांद्याचे तुलनात्मक भाव (रुपये प्रतिक्विंटल)  
राहुरी ......... 15000 ते 21000 
पारनेर........   9000 ते 13100 
राहाता.........  8000 ते 15100 
मुंबई.........  11500 ते 13000 
पुणे.............12500 ते 14000 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

Delhi NCR PUC Rule : आजपासून 'पीयुसी' नसलेल्या वाहनांना पेट्रोल-सीएनजी मिळणार नाही; नंबर प्लेटवरून होणार तपासणी

SCROLL FOR NEXT