amaranath yatra 2022 
पश्चिम महाराष्ट्र

अमरनाथ दुर्घटनेत सांगलीतील 5 जण बचावले, भाविकांचा नातेवाइकांशी संपर्क

भाविकांनी नातेवाइकांशी संपर्क साधलेला असला, तरी घरातील लोक चिंतेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सांगली - अमरनाथ यात्रेसाठी गेलेले गुंडेवाडी (ता. मिरज) येथील सरपंच भाऊसाहेब पाटील यांच्यासह पाच भाविक सुखरूप आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील सांगली, मिरज, कवलापूर, गुंडेवाडी, कवठेएकंद आदी गावांतून सुमारे ४०० हून अधिक भाविक गेल्याची माहिती समोर येत आहे. ते सर्व सुखरूप आहेत. भाविकांनी नातेवाइकांशी संपर्क साधलेला असला, तरी घरातील लोक चिंतेत आहेत. यात्रेसाठी गेलेल्या भाविकांत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे मित्र परिवारातर्फे पाठविलेल्या व अन्य भाविकांचा समावेश आहे.

गुंडेवाडी (ता. मिरज) येथील सरपंच भाऊसाहेब पाटील यांच्यासह पाच भाविक काल (ता. ८) झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी होते. त्यातील तीन जण गायब झाले होते. तब्बल १८ ते २० तासांनी आज सायंकाळी त्यांची भेट झाली. कवलापुरातील ४० भाविक दर्शन घेऊन सुखरूप मनीग्रामला (बाल्टार) खाली परतले आहेत. सतीश माळी या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन व्यापारी दुकाने, चार टेंट (छावण्या), एक लंगर (महाप्रसाद केंद्र) वाहून गेल्याची माहिती आहे.

आपत्ती निवारण पथकांकडून भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना घडल्यावरही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डोंगरे मित्र परिवार पथकातील २०० भाविक आज पुन्हा पुण्याहून रेल्वेने अमरनाथसाठी जम्मूकडे रवाना झाले आहेत. कवठेएकंद येथील सात ते आठ भाविक सुखरूप आहेत.

डोंगरे मित्र परिवारातर्फे गेली १४ वर्षे अमरनाथ यात्रेसाठी भाविकांना पाठविले जात आहे. पहिल्या वर्षी ४०, दुसऱ्या वर्षी ८० वरून सुरुवात झाली होती. यंदा २५० भाविक अमरनाथला जाणार आहेत. त्यातील तीन पथके आतापर्यंत गेली आहेत. त्यातील पहिल्या पथकात कवलापूरचे ४० जण दर्शन घेऊन परत येत आहेत. सांगली जिल्ह्यातून सर्वसाधारण चार ते साडेचार हजार भाविक दर्शनासाठी जातात. यंदा एकाच वेळी रेल्वेचे आरक्षण न झाल्याने २०० भाविकांचे पथक पाठवून दिले जात आहे. सांगली ते पुणे खासगी बस, पुणे ते जम्मू किंवा अंबाला (पंजाब)पर्यंत रेल्वे व तेथून ३० ते ४० खासगी बसने त्यांना अमरनाथ यात्रेसाठी पाठविण्याची व्यवस्था केलेली आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाकडे केवळ २५ भाविक अडकले असून, ते सुखरूप असल्याची माहिती रात्री उशिरापर्यंत झाल्याची माहिती आहे. सांगलीतील अविनाश मोहिते, मिलिंद धामणीकर, विनायक पटवर्धन यांच्यासह २५ जण सुखरूप असल्याची माहिती श्री. मोहिते यांनी दुपारी जिल्हा प्रशासनाला कळवली. त्यानंतर त्यांचा दूरध्वनीच आलेला नाही. त्यांच्याशी पुन्हा संपर्क झालेला नाही.

रावसाहेब पाटील बचावले...

रावसाहेब पाटील (रा. गुंडेवाडी) दर्शनासाठी घोड्यावर बसून निघाले होते. ते घोड्यावर बसले. काही अंतरावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि घोड्यावरून कोसळले. दरीच्या विरुद्ध बाजूला ते पडले. ‘दरीच्या दिशेने पडलो असतो तर काही खरे नव्हते’, अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे ते दर्शनाशिवाय खाली येत आहेत. त्यांच्या चुकलेल्या तीन साथीदारांचीही सायंकाळी भेट झाली असून, ते श्रीनगरजवळील बाल्टार येथे सध्या सुखरूप आहेत.

गुंडेवाडीचे तिघे सुखरूप

मिरज तालुक्यातील गुंडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पाटील, सुरेश पाटील, सदाभाऊ सरक, रामचंद्र पाटील, रावसाहेब पाटील एकावेळी यात्रेसाठी गेले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी झाली. त्या वेळी तीन जण गायब झाले होते. १८-२० तासांनी त्यांची आज सायंकाळी इतरांशी भेट झाली.

डोंगरे मित्र परिवारातर्फे अमरनाथ यात्रेचे यंदा १४ वे वर्ष आहे. यंदा दोन हजार ५० भाविक गेले. गेलेले सर्व सुखरूप आहेत. समूहाने गेल्यावर आत्मविश्‍वास वाढल्याने अनेक जण छोट्या गटांनी वैयक्तिक जात आहेत. भोलेनाथांच्या भक्ती व श्रद्धेपोटी आम्ही हे करीत आहे. यासाठी आणखी नव्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे.

- शिवाजीराव डोंगरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT