Anna says the government is doing well 
पश्चिम महाराष्ट्र

अण्णा म्हणतात, सरकार चांगलं काम करतंय

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी : ""कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलत योग्य वेळी लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कोरोनाला रोखण्यात आपल्याला चांगले यश आले. नागरिकांनी शासनाचे आदेश पाळून, घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे,'' असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. 
पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आज सायंकाळी उशिरा येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या स्थितीची माहिती सिंह यांनी दिली. लॉकडाउन काळात अनेक दानशूर व्यक्ती गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

मदतीचे वितरण करताना प्रशासनाला सहकार्य करीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. सिंह म्हणाले, ""यूपीएससीची तयारी करताना माझ्यासमोर माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम व अण्णा हजारे ही प्रेरणास्थाने होती. त्या काळात कलाम व हजारे यांच्याविषयी खूप वाचले. नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. हजारे यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला आवडेल.'' त्यावर हजारे यांनी, कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करू, असा शब्द दिला. हजारे यांनी सिंह यांना विविध पुस्तके भेट म्हणून दिली. 

सुरक्षा कमी करण्याचा पुन्हा आग्रह 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांची गरज असल्याने, आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे हजारे यांनी याआधीच केली होती. त्यानुसार सुरक्षा कमी करण्याचा आग्रह अण्णा हजारे यांनी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे धरला. त्यावर, आपल्या सुरक्षेचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील असल्याचे सिंग यांनी त्यांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT