Anna supported the state as well as the country 
पश्चिम महाराष्ट्र

अण्णांना राज्यासह देशातूनही पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनाचा आज चौथा दिवस होता. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज म्हसणे फाटा येथील श्री समर्थ शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्‍निक व इंग्रजी माध्यमाच्या मुलींनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मुलींनी हजारे यांच्या समर्थनार्थ भाषणेही केली. त्यानंतर दिलेल्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. 

श्री समर्थ पॉलिटेक्‍निकच्या व इंग्रजी माध्यमातील मुली व शिक्षकांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांना पाठिंबा दिला. प्राचार्य शिल्पा गाडिलकर, डॉ. अरुणा भामरे व पॉलिटेक्‍निकच्या प्राचार्य श्रुती अंबाडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. 

मालेगाव येथील राष्ट्रीय पाठशाळेच्या मुलांनीही हजारे यांची भेट घेतली. काही समर्थक थेट राजस्थानातून आले होते. विदर्भातील पशुवैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत अण्णांना भेटून पाठिंबा दिला. काल दिवसभरात पिंपळनेर, राळेगणसिद्धी येथील भजनी मंडळांनी यादवबाबा मंदिरात भजने सादर करून पाठिंबा दिला. 

निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा तपास तातडीने करावा आदी मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलन सुरू केले आहे. "माझी कोणाकडेही काही मागणी नाही. मौन कोणी व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधात नाही. महिलांवर होणारे अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आहे. अन्याय व अत्याचाराविरोधात महिलांना लवकर न्याय मिळावा, यासाठी आहे,' असे निवेदन हजारे यांनी "सकाळ'कडे लेखी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT