paschim maharashtra sakal
पश्चिम महाराष्ट्र

आप्पाचीवाडी : येथील हालसिध्दानाथ यात्रेची सांगता झाली.

आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता

अनिल पाटील

कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा भक्तीमय वातावरण झाली. आज (ता. २५) पालखी मिरवणुकीने या यात्रेची सांगता झाली.

गुरुवारी सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरात मानकरी, पुजारयांच्या उपस्थितीत आरती व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक आप्पाचीवाडीत आणली. तेथे कुर्ली-आप्पाचीवाडी पालखी, अश्व, छत्री प्रमुख मार्गावरून खडक मंदिराजवळ आल्यावर मंदिर प्रदक्षिणा केली. यावेळी ढोल जागर, वालंग, हेडाम झाला. यावेळी मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

मंदिरात रोज सकाळी, सायंकाळी सात वाजता आरती केली. रोज रात्री वालंग, ढोल जागर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली. शनिवारी पहाटे भगवान ढोणे यांची पहिली भाकणूक झाली. रविवारी पहाटे या यात्रेची मुख्य भाकणूक झाली. प्रशासनाने यात्रा रद्द केल्याने कोणत्याही प्रकारची दुकाने लावली नव्हती.

यात्राकाळात निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस फौजफाटा तैनात केला होता.

सलग पाच दिवस कोल्हापूर येथील कल्लाप्पांण्णा पत्रावळे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

सोमवारी सायंकाळी आप्पाचीवाडी-कुर्ली पालखी मंदिर प्रदक्षिणा करून वाडा मंदिराकडे व तेथून पालखी कुर्लीकडे रवाना झाली. कुर्ली येथील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक हालसिद्धनाथ मंदिरात आली. त्यानंतर पाच दिवस सुरू असलेल्या हालसिध्दनाथ यात्रेचे सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT