पश्चिम महाराष्ट्र

आता मीटर टाकावाच लागणार 

सकाळवृत्तसेवा

सातारा - नव्या दरप्रणालीनुसार मीटरमध्ये दुरुस्ती करण्याची रिक्षाचालकांना दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेपासून मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे मीटरनुसार भाडे आकारणीस नकार देणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. 

इंधनाचे वाढते दर, विम्याच्या दरात झालेली वाढ, गाडीचा मेंटेनन्स या सर्वांमुळे रिक्षा व्यावसायिकांना मीटरनुसार भाडे आकारणी करणे शक्‍य नसल्याची रिक्षाचालकांची ओरड होती. त्यांची ही मागणी जिल्हा रिक्षा, जीप, टॅक्‍सी संघटनेच्या माध्यमातून दीपक पवार यांनी वारंवार लावून धरली होती. मात्र, भाडे निश्‍चितीचे सूत्र ठरले नसल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून भाडेवाढ केली जात नव्हती. सततच्या पाठपुराव्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दीड महिन्यापूर्वी रिक्षा भाड्याची पुनर्निश्‍चिती केली. त्यात रिक्षाचालकांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी असलेला पहिला टप्पा एक किलोमीटरचा करण्याचे तसेच त्याला 20 रुपये भाडे आकारण्याची मागणी पूर्ण झाली. या निर्णयामुळे रिक्षाचालकांना चांगले भाडे मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी मीटरनुसार भाडे आकारणी करावी, अशी सूचना श्री. धायगुडे यांनी रिक्षा संघटनांना केली होती. 

नव्या नियमानुसार भाडे आकारणीसाठी रिक्षाचालकांना मीटरमध्ये सेटिंग करून घेणे आवश्‍यक होते. त्याला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी 45 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत येत्या पाच सप्टेंबरला संपत आहे. या कालाधीत बहुतांश रिक्षाचालकांनी मीटरमध्ये आवश्‍यक ते बदल करून घेतले आहेत. उरलेल्यांनी तातडीने मीटरमध्ये बदल करून तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत मीटरप्रमाणे भाड्याची आकारणी व्हावी, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी मीटरचा वापर करावा, असे आवाहन श्री. धायगुडे यांनी केले आहे. प्रशासनाबरोबरच रिक्षा संघटनांनीही मीटरनुसारच भाडे आकारणी करावी, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केले आहे. 

नागरिकांनी तक्रार करावी - संजय धायगुडे 
रिक्षाचालकांना त्यांच्या मागणीनुसार भाडेवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी मीटरनुसारच भाडे आकारले पाहिजे. जे रिक्षाचालक त्याला नकार देतील, त्यांच्याबाबत नागरिकांनी तक्रार करावी. निनावी तक्रार आली तरीही कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे. 


नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा - पवार 
प्रशासनाने रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार भाडेवाढ दिली आहे. त्यातून चांगले भाडे मिळणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी मीटरनुसारच भाडे घ्यावे. नागरिकांची अडवणूक करू नये. मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रशासनाने कारवाई करावी. संघटना त्यांच्या पाठीशी राहील, असे दीपक पवार यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

Pune Water Cut : रामटेकडी टाकीची जलवाहिनी फुटल्यामुळे हडपसर व परिसरात शनिवारी पाणीपुरवठा बंद; मनकरी, मुंढवा इत्यादी भागांना पाणी नाही!

Khambatki Ghat: लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचा खांबाटकी घाटात ब्रेक फेल; तीन वाहनांना उडवलं

Fake Marriage Promise : पुण्यात खोट्या लग्नाच्या वचनाखाली लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल!

Uday Joshi : पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात निधन!

SCROLL FOR NEXT