Arya 
पश्चिम महाराष्ट्र

आर्या देणार शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सामाजिक संदेश (Video)

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडीसारख्या ग्रामीण भागातील नववीत शिकणारी आर्या जितेंद्र कदम ही मुलगी सोलापुरातील निर्मिती असलेल्या व सामाजिक संदेश देणाऱ्या "रमण' या एक तासाच्या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये "आर्या' ही प्रमुख भूमिका साकारत आहे. 

हेही वाचा : जयंत पाटील म्हणाले, "इथल्या' सत्ताकारणात अजून लक्षं घातल नाही 
रमण'या प्रमुख भूमिकेत रमण यल्ला 

आर्या हिला लहानपणापासूनच नृत्य, संगीत, खेळाची आवड आहे. वैयक्तिक तसेच समूहनृत्य दिग्दर्शन करते. तिला आतापर्यंत स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील नृत्याची बक्षिसे मिळाली आहेत. तिला सिनेमाची ऑडिशन असल्याचा मेसेज मिळाला. ऑडिशनमध्ये निवड झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत संभारंब यांनी सात दिवसांची कार्यशाळा घेतली. निर्माते ऍड. अजय यल्ला, तर "रमण'या प्रमुख भूमिकेत रमण यल्ला आहेत. ती नूतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिकत असून प्राचार्या शिल्पा चिंचवडकर यांनी तिला परवानगी देत चित्रीकरण दरम्यान बुडालेला तिचा शालेय अभ्यासही स्कूलने पूर्ण करून घेतला. वडील जितेंद्र कदम, आई जान्हवी कदम, काका रविकिरण कदम, अशोक कदम यांच्यासह कुटुंबीयांनी तिला प्रोत्साहन दिले. 

हेही वाचा : सापडलेले अडीच लाख केले परत 
हा आहे सामाजिक संदेश 

मला नृत्य आणि अभिनयाची आवड आहे. टीनएजर्स गटातील मुलींनी काय करावे व काय करू नये याबाबत तसेच मुलींनी पालकांचे ऐकावे याबाबत सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. 
- आर्या कदम, कलाकार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT