सातारा ः माता मृत्यू आणि बाल मृत्यूना आळा घालणाऱ्या, उन्ह - वारा अन् पावसाची तमा न बाळगता डोंगरदऱ्यांसह सर्वत्र घरोघरी पायी फिरून गरोदर मातांची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका म्हणजे गुलाबी साडीतील देवदूतच. अशा या आशांचे कौतुक करण्यासाठी एक फेब्रुवारी राज्यभर "आशा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त उद्या (शनिवार) प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, तसेच विविध स्पर्धांत यश मिळविणाऱ्या आशांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
आरोग्य विभागाकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन हजार 716 आशा म्हणून महिला काम करत आहेत. शासनाने त्यांच्यावर महत्त्वाची कामे सोपविली आहेत. प्रसूती, आरोग्याबाबतची अनास्था, समाजात होणारे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण तसे मोठे होते. ते रोखणे आदी महत्त्वाची कामे आशा सेविका यांच्यावर शासनाने सोपविले आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजना यशस्वी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आशा गावागावांत तैनात करण्यात आल्या आहेत. त्या घरोघरी फिरून गरोदर मातांची नोंद करतात. या मातांना गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार सेवा मिळाव्यात, यासाठी त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. "बाळाची घरी घ्यावयाची काळजी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक बाळाला घरभेटी देऊन आशा स्वयंसेविकांनी 45 दिवसांच्या आत होणाऱ्या अर्भक मृत्यूचे प्रमाण रोखण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
नक्की वाचा - धिस चेअर वुईल मिस यू !
आशा स्वयंसेविका शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करत असतात. नागरिक आणि शासनामधील त्या महत्त्वाचा दुवा ठरल्या आहेत. असे महत्त्वाचे काम करणाऱ्या या आशा स्वयंसेविकांना त्यामानाने मानधन तटपुंजे मिळते, तरी त्या अत्यंत निष्ठेने कामे करत आहेत. अशा या आशा स्वयंसेविकांच्या गौरव करण्यासाठी उद्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खास कार्यक्रम आयोजित करून त्यांचे कौतुक करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे.
हेही वाचा - Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ
आशाचे कार्य...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.