Ashadhi Wari 2023 esakal
पश्चिम महाराष्ट्र

Ashadhi Wari : आता दिंडी, पालखी सोहळ्यात असणार 'आपला दवाखाना'; 22 पथकं 24 तास राहणार तैनात

जिल्हा परिषद आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी वारीपासून वारकऱ्यांच्या सेवेत उतरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

वारीत टँकरमधील पाण्याचीही वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे.

सांगली : यंदा आषाढीनिमित्त (Ashadhi Wari 2023) निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या, तसेच पालखी सोहळ्यासाठी आरोग्य सेवा पुरवण्याचा संकल्प जिल्हा परिषद आरोग्य विभागानं (Health Department) केला आहे. यामध्ये आरोग्य तपासणीसह उपचार पुरवण्यात येणार आहेत.

प्रत्येक दिंडीप्रमुखांकडे औषधांचे किट देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्यदूत, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 'आपला दवाखाना' हा फिरता दवाखाना सज्ज झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.

माने म्हणाले, 'जिल्हा परिषद आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी वारीपासून वारकऱ्यांच्या सेवेत उतरत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील अन्य कर्मचारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वारीत टँकरमधील पाण्याचीही वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे.'

कशी असेल आरोग्य सुविधा..?

  • पालखीमार्गावर किमान पाच किलोमीटरवर एक आरोग्य पथक औषध साठ्यासह तैनात.

  • दुचाकीवरून दोन कर्मचाऱ्यांची (आरोग्यदूत) २२ पथके कार्यरत असणार. ही पथके २४ तास कार्यरत राहणार.

  • पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी तांत्रिक कार्यवाही करणार.

  • कीटकजन्य आजार होऊ नयेत, याचीही दक्षता घेतली जाणार.

  • चित्ररथाद्वारे पालखीमार्गावर आरोग्यशिक्षण दिले जाणार.

  • रुग्णवाहिकेत डॉक्टर, आरोग्य सेविका, औषधांसह फिरते दवाखाने मुक्कामाच्या ठिकाणी मिळणार

औषधांचे किट...

आरोग्य विभागाने अंगदुखी, उलटी, जुलाब, ताप आदी किरकोळ आजारांवरील औषधे असणारे एक किट तयार केले आहे. हे किट दिंडीप्रमुखांकडे दिले जाणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी औषधे लागली तर वारकऱ्यांना ती तातडीने मिळू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT