Railway  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Ashadhi Wari : खासदार-आमदारांनी त्यावर 'ब्र'ही काढला नाही; रेल्वे प्रशासनाची कंजुषी, भाविकांचा हिरमोड

पुणे रेल्वे विभागीय कार्यालयाने (Pune Railway Divisional Office) कोल्हापूरातून एकही विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केलेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

पुणे विभागाकडून विशेषतः कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर भाविकांची संख्या जास्त असूनही एकही विशेष गाडी सोडलेली नाही.

कोल्हापूर : राज्यातील लाखो भाविकांना पंढरपूरच्या आषाढी यात्रेची (Ashadhi Wari 2023) आस लागली आहे. असंख्य भाविक पंढरपूरची वाटपायी चालू लागले आहेत. तेवढेच भक्तगण यात्रेला एसटी किंवा रेल्वेने जाणार आहेत. त्यांच्यासाठी राज्यातील विविध मार्गावरून पंढरपूर यात्रेसाठी ६ विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.

मात्र, यात पुणे रेल्वे विभागीय कार्यालयाने (Pune Railway Divisional Office) कोल्हापूरातून एकही विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केलेले नाही. एसटी महामंडळाने (ST Corporation) पंढपूर यात्रा जवळ येऊनही जादा गाड्याचे नियोजन केलेले नाही. परिणामी भाविकांचा हिरमोड होत आहे. असे असूनही स्थानिक खासदार, आमदारांनी त्यावर 'ब्र’ही काढलेला नाही.

रेल्वे प्रशासनाने जालना- पंढरपूर - नांदेड, औरंगाबाद - पंढरपूर - औरंगाबाद तर अदीलाबाद - पंढरपूर -अदीलबाद या मार्गावर पाच विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून असे नियोजन झाले. तसे आदेश आले. त्यानुसार दोन दिवसात या विशेष रेल्वे गाड्या पंढरपूर मार्गावर धावणार आहेत.

मात्र, पुणे विभागाकडून विशेषतः कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर भाविकांची संख्या जास्त असूनही एकही विशेष गाडी सोडलेली नाही. कोल्हापुरातून शेकडो दिंड्या पंढरपूरला जातात तसे व्यक्तीगतस्तरावर भाविकही जातात. त्यांना याशिवाय व्यक्तीगतस्तरावर अनेकजण एसटी किंवा रेल्वेने पंढपूरला जातात.

त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने पंढरपूरला जाण्यासाठी यात्रा कालावधीत विशेष रेल्वे सोडणे गरजेचे होते. कारण कोकणातून येणारा भाविकही कोल्हापूर मार्गे रेल्वेने पंढरपूर जाणे शक्य आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात कंजुषी केल्याने पेच निर्माण झाला आहे.

एसटीचा आळशी कारभार

एसटी महामंडळ पंढरपूरसाठी यात्रेसाठी दरवर्षी जादा गाड्याचे नियोजन पंधरा दिवस अगोदरच होते. मात्र, यंदा यात्र नियोजन करणाऱ्या बहुतेक एसटी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बहुतेक नवीन अधिकारी येथे आलेत. परिणामी अद्याप पंढरपूर यात्रेचे नियोजन एसटीकडून जाहीर झालेले नाही. त्यामुळे यात्रेकरूंना प्रवासाचे नियोजन करणेही अशक्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT