Ashok Lande murder case bail granted Kotkar brothers 
पश्चिम महाराष्ट्र

अशोक लांडे खून प्रकरण; कोतकर बंधूंना जामीन

सकाळ वृत्तसेवा

नगर : केडगावमधील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप व सचिन भानुदास कोतकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व सुरेंद्र तावडे यांनी आज (ता. 13) जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना नगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही, असेही निकालात स्पष्ट केले आहे.

शेवगाव येथील रहिवासी असलेला लॉटरी विक्रेता अशोक भीमराज लांडे यांचा 19 मे 2008 रोजी केडगावमध्ये खून झाला होता. त्या प्रकरणात शंकर राऊत यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात सप्टेंबर 2013मध्ये भानुदास कोतकर याच्यासह संदीप, सचिन आणि अमोल व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. 

चौघांना जन्मठेपेची शिक्षा

या खटल्याची सुनावणी नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात झाली. या खून प्रकरणात सहा जणांना दोषी धरण्यात आले. त्यात भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप, सचिन व अमोल या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, यातील भानुदास कोतकर याला यापूर्वीच उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ अमोल कोतकरलाही जामीन मिळाला.

जिल्हाबंदी घालण्यात आली

माजी महापौर संदीप आणि सचिन यांनाही काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर झाला. मात्र, जामीन कालावधीत त्यांना जिल्हाबंदी घालण्यात आली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Sharad Pawar: सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Badminton : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू दोन वर्षानंतर जेतेपदाची लढत खेळणार; Japan Open च्या फायनलमध्ये प्रवेश

Donald Trump: FIFA फायनलमध्ये ट्रम्पची एंट्री! विजेत्या खेळाडूंना मिळणार सोन्याची खास अंगठी

SCROLL FOR NEXT