पश्चिम महाराष्ट्र

डॉ. महेश जाधव यांना सात दिवस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पोलिसांनी डॉ. जाधवविरुद्ध निष्काळजी आणि बेजबाबदारपणे उपचार करून मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल केला.

मिरज (सांगली) : निष्काळजी आणि बेजबाबदारपणे कोरोना रुग्णांवर उपचार करून अनेक रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केलेल्या ॲपेक्स रुग्णालयाचे संचालक डॉ. महेश जाधव (dr. mahesh jadhav)यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. बंडगर यांनी शनिवारी दिले. (at miraj dr. mahesh jadhav has been remanded in police custody for seven days)

शुक्रवारी (ता.१८) रोजी सायंकाळी डॉ. महेश जाधव याला नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीस अनुसरून पोलिसांनी केलेल्या तपासात रुग्णालयातील अनेक गैरप्रकार उघडकीस आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडील चौकशीसह रुग्णालयातील कागदपत्रांच्या तपासणीमध्येही रुग्णांवर उपचार करताना कोरोना विषयक शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि तत्त्वांचे पालन झाले नसल्याचेही पोलिसांना तपासात आढळले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. जाधवविरुद्ध निष्काळजी आणि बेजबाबदारपणे उपचार करून मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल केला.

हा गुन्हा दाखल होताच जाधव याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. तेथे जाधव याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याने मुंबईस पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्याला कासेगाव येथे ताब्यात घेतले आणि शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी त्याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी शनिवारी (ता. १९) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एन. बंडगर यांच्या न्यायालयात त्याला उभे केले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. श्रीमती जोशी यांनी बाजू मांडली. यामध्ये ॲड. जोशी यांनी संशयित डॉ. जाधव याच्याकडे अद्याप बराच तपास करायचा असल्याने त्याला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. सरकार पक्षाच्यावतीने केलेली मागणी ग्राह्य मानून न्यायालयाने डॉ. जाधव याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.(at miraj dr. mahesh jadhav has been remanded in police custody for seven days)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT