Atpadi Murder of married woman immoral relationship close cousin at lodge crime  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Atpadi Crime : लॉजवर सख्या चुलत दिराकडून अनैतिक संबंधाच्या कारणावरून विवाहितेचा खून

सख्खा चुलत दीर याच्याविराेधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागेश गायकवाड

आटपाडी - पूर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून शहरातील एका हॉटेलच्या लॉजवर एकाने महिलेचा भिंतीवर डोके आपटून आणि गळा दाबून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. छाया मधुकर देवडकर वय 33 असे मृत महिलेचे नाव आहे.

या खुनाची फिर्याद पती मधुकर देवडकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी महिलेचा सख्खा चुलत दी नानासो हणमंत देवडकर रा. पिंजरवस्ती, निंबवडे याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, छाया मधुकर देवडकर रा. विठ्ठलनगर आटपाडी या आटपाडीत विठ्ठल नगर येथे पती आणि दोन मुलासमवेत राहत होत्या. त्यांचे मूळ गाव निंबवडे होते. कौटुंबिक वादाच्या कारणातून हे कुटुंब आटपाडीत राहायला आले होते.

दरम्यान, आज शनिवारी सकाळी बाजार समितीच्या समोरील हॉटेल स्टार च्या लॉजचवर खोली नंबर चार मधून दुर्गंधीचा वास कर्मचाऱ्यांना आला. कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला बाहेरून कुलूप होते.

कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यानी तात्काळ पोलिसांना याची माहिती कळवली. खोलीचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केल्यावर त्यांना छाया मधुकर देवडकर यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवार ता. 4 रोजी नानासो हणमंत देवडकर रा. पिंजरावस्ती निंबवडे याने ही खोली दोघांच्या नावे राहण्यासाठी म्हणून बुक केली होती.

खोली बुक करून दोघेही खोलीत गेले. नात्याने नानासो देवडकर हा छाया देवडकर यांचा सख्खा चुलत दिर आहे. तिथे दोघांच्या पूर्वीच्या अनैतिक संबंधावरून दोघांच्यात वाद झाला. या वादातून नानासो देवडकर याने छाया देवडकर हिचे डोके भिंतीवर आपटून आणि गळा दाबून खून करून पोबारा केला.

दोन दिवसानंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नानासो देवडकर याचाही विवाह झाला असून त्याला दोन मुल आहेत. लॉजच्या रजिस्टरवर असलेल्या नोंदीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तर छाया देवडकर हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या कुणाची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीवर्धने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT