Gopichand Padalkar Team eSakal
पश्चिम महाराष्ट्र

पडळकरांच्या गाडीवर हल्ला; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले!

या घटनेत काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचं समजतं आहे.

सुधीर काकडे

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये झालेल्या या घटनेत राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटात वाद झाला. या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. या प्रकरणात एका कार्यकर्त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. पडळकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या काही वाहनांची तोडफोड झाल्याचं देखील समोर आलं आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमधील साठे चौकात झालेल्या या घटनेत राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. या वादाचं मुळ कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवारांच्या पळवापळवी असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावेळी पडळकरांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीनंतर पडळकर समर्थक आणि विरोधी गटांत मोठा वाद झाला असून, या वादात काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर यापूर्वी देखील दगडफेक झाली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT