आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न
आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेतील आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मिरज : शहरातील महापालिका कार्यालयासमोर सुरू असलेल्या म्हाडा कॉलनीतील नागरिकांच्या आंदोलनामध्ये आज एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला आंदोलक आणि पोलिसांनी रोखले. गणेश नायडू (वय ३९) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ज्याच्या मृत्यूबाबत हे आंदोलन झाले. त्या मोहम्मद चांद शेख याच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी (ता. २७) रोजी म्हैसाळ रस्त्यावरील म्हाडा कॉलनीमध्ये मोहम्मद चांद शेख (वय ४०) याचा जिन्याच्या पायरीवरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. या इमारतीमधील जिन्याच्या पायऱ्या खराब झाल्यामुळेच मोहम्मद शेख पाय घसरून पडला, असा येथील नागरिकांचा आरोप आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसह महंमद शेख याला नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मोहम्मद शेख याचे कुटुंबीय आणि येथील नागरिक गेल्या चार दिवसांपासून चाबूकफोड व अन्य प्रकारे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंदोलनाची महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी मोहम्मद शेख याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांसह शेख यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून महंमद शेख यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आणि पोलिस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार पार पाडले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर आंदोलक पुन्हा महापालिकेसमोर आले आणि घोषणाबाजी सुरू केली. याच वेळी गणेश नायडू या आंदोलकाने डोक्यावर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला अन्य आंदोलन आणि पोलिसांनी रोखले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले. दरम्यान, याच आंदोलकांनी उद्या शुक्रवारपासून आपले आंदोलन सांगलीच्या महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT