Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

'औज'ची समस्या सोडविण्यासाठी सोलापूरच्या महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : औज आणि चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याचा कर्नाटक हद्दीतून सतत होणारा उपसा थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी "सकाळ'ला सांगितले. दरम्यान, हा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटावा यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात ' सकाळ' मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.

विजयपूर जिल्ह्यातील संख आणि धुळखेड गावातील शेतकऱ्यांकडून औज आणि चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतून सातत्याने पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार सध्याचे पाणी 5 जानेवारी 2019 पर्यंत शहराला देणे शक्‍य आहे. मात्र, सातत्याने होत असलेल्या उपशामुळे डिसेंबरच्या पंधरवड्यातच दोन्ही बंधारे कोरडे पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी संख व धुळखेड येथील शेतीसाठीचा वीजपुरवठा नियंत्रित करण्याचे पत्र विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

बंधारे भरले की ही समस्या निर्माण होते. त्यामुळे त्यावर कायम तोडगा काढावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे सौ. बनशेट्टी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,""हा प्रश्‍न दोन राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार नाही आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने तोडगा काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.'' दरम्यान, दोन्ही बंधाऱ्यांच्या परिसराची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बंधाऱ्यात पाणी असेपर्यंत हे पथक प्रत्येक आठवड्यात बंधारा परिसरात जाऊन पाहणी करणार आहे. 

पावसाळ्यापर्यंत "एबीडी' ला तीन दिवसांआड पाणी 
हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने स्मार्ट सिटी योजनेतील परिसराला पावसाळ्यात हिप्परगा तलाव पूर्ववत होईपर्यंत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उजनी योजना आणि दयानंद टाकीवर अवलंबून असलेल्या दक्षिण व उत्तर कसबा, भवानी पेठचा काही भाग, घोंगडे वस्ती या परिसराचा एबीडी एरियातील या योजनेत समावेश आहे. रोज एक तास पाणी या प्रमाणे सुरवातीला काही दिवस पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र खंडित वीजपुरवठ्यामुळे नियोजन विस्कळित झाले आणि त्यानंतर आता हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने एबीडी एरियाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुरज चव्हाणचं लग्न नव्हे तर इव्हेंट, लग्नात उपस्थित राहणार बॉलिवूडचे दिग्गज कलाकार, लग्नपत्रिकेतून सेलिब्रिटींनी दिलं आग्रहाचं निमंत्रण

AB de Villiers: 'इमोशनल कोच असणं फारसं चांगलं नसतं...' गौतम गंभीरबद्दल बोलताना डिविलियर्स नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक

Kolhapur Politics : पायाला भिंगरी बांधून उमेदवारांची धावपळ; प्रॉपर्टी कार्ड ते स्वच्छता, मुद्द्यांनी तापली कोल्हापूरची निवडणूक!

Nagar Panchayat Election : नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT