पश्चिम महाराष्ट्र

बाळाचे बारशे कोल्हापूरात अन्‌ पाहुण्यांची हजेरी जगभरातून

सकाळवृत्तसेवा

सांगली : सध्याच्या टाळेबंदीत अनेक उत्सव-सोहळ्यांवर पाणी पडले असतानाही तंत्रज्ञानाच्या मदतीने काही घरगुती सोहळे होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विट्याच्या विनोद गुळवणी यांच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्‍या नातवाचे ऑनलाईन बारसे घातले. झुम ऍपच्या माध्यमातून गुळवणी कुटुंबियांच्या राज्य आणि जगभरातील विविध देशातील कुटुंबियांनी हजेरी लावली. मुख्य सोहळा होता कोल्हापूरात. बाळाच्या कानात कुर्रर्र करीत रुद्र नाव ठेवण्यात आले.

डॉ.निखिल आणि डॉ.सायली या दाम्पंत्याचा मुलगा रुद्र याचे बारसे अक्षय तृतियेच्या मुर्हतावर झाले.कोल्हापुरातील या सोहळ्यासाठी गुळवणी कुटुंबियांनी विट्यातून तसेच बाळाच्या आत्या, काका,मामा, मावशी यांनी ठिकठिकाणांहून हजेरी लावली. अमेरिका, लंडन, सिंगापूर,नागपूर, जबलपूरसह ठिकठिकाणच्या सव्वाशेव नातलगांनी या डिजिटल बारशाला हजेरी लावली. त्यातून कोविडच्या आपत्तीवर मात करीत बारशाचा महुर्तही सर्वांनी साधला.
डॉ.निखिल हे कोल्हापूरातील ऍपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये कर्करोग सर्जन म्हणून तर डॉ सायली कोल्हापूरमध्ये नेत्रतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT