0crime_201_74.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ड्युटीवर नसताना बेकर चालवली 

सकाळवृत्तसेवा


सांगली ः राहुल शिंगटे हा ड्युटीवर नसतानाही शहर पोलिस ठाण्यातील बेकर गाडी त्याने चालवल्याची महत्वपूर्ण साक्ष बेकर चालक पोलिस संजय पाटील यांनी न्यायालयासमोर दिली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर आज अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास केला. त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.

 
खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, की सांगली शहर पोलिसांनी लुटीच्या संशयावरून अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. अनिकेतचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळण्यात आला. याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याचे कामकाज पाहत आहेत. आजच्या सुनावणीत बेकर गाडीवर चालक पोलिस संजय पाटील यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. 


साक्षीमध्ये ते म्हणाले,""सन 1994 मध्ये राज्य राखीव दलात भरती झालो. सन 2016 साली सांगली शहर पोलिस ठाण्यात चालक म्हणून नेमणूक झाली. 5 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी नऊ ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊपर्यंत ड्युटी केली. त्यावेळी गाडीचे मिटर रिडींग 85399 होते. 6 नोव्हेंबर रोजी 85399 रिडिंग होते. त्यात राहुल शिंगटे याने खाडाखोड करून 85433 असे दिसून आले. शिंगटे याचे अक्षर ओळखत असल्याने त्याला फोन लावला. त्यावेळी त्याने खाडाखोड केल्याचे दिसून आले. तसेच ड्युटीवर नसतानाही गाडी चालविल्याचे त्याने सांगितले. केलेली खाडाखोड दुरूस्त करून देतो, असेही म्हणाला. याबाबतचा लेखी अर्ज वरिष्ठांना दिला आहे.'' 

बचावपक्षातर्फे ऍड. प्रमोद सुतार, ऍड. दिलीप शिरगावकर, ऍड. शिरगुप्पे यांनी उलट तपास घेतला. तपास अदिकारी सीआयडीचे पोलिस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी हे उपस्थित होते. 


17 फेब्रुवारीला सुनावणी 
कोथळे खून खटल्याची सुनावणी आता 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यावेळी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या जाणार आहेत. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपचा पहिला गुलाल, सत्तेचा दावा अधिक बळावला

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

SCROLL FOR NEXT