Eknath Shinde esakal
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रवेशबंदी करा'; मराठी भाषक, म. ए. समिती आक्रमक, काय आहे कारण?

एकनाथ शिंदे यांना सीमाभागात विरोध सुरु झाल्यामुळे पोलिस सतर्क झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

म. ए. समिती उमेदवार विरोधात लढणाऱ्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दौऱ्यावर येत असल्यामुळे विरोध सुरू आहे.

बेळगाव : भाजप उमेदवार प्रचारार्थ सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज गुरुवारी (ता. २) बेळगाव व खानापूरला येणार आहेत. त्यांच्या या सभेला सोशल मीडियावर विरोध सुरु आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. काहींनी म.ए. समितीच्या मेळाव्याला महाराष्ट्रातून नेते येणार असल्याचे कळताच प्रवेश बंदी घातली जाते. १४४ कलम जारी केले जाते.

प्रशासनाने निर्बंध जारी करून एकनाथ शिंदे यांना रोखावे, अशी मागणी केली आहे. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर (BJP candidate Jagadish Shettar) यांच्या प्रचारार्थ २ एप्रिलला मुख्यमंत्री शिंदे यांची बाळेकुंद्रीत सभा होत आहे. तर कारवार उमेदवार विश्‍वेश्‍वरय्या कागेरी-हेगडे यांच्या प्रचारार्थ खानापूर येथे सभा होणार आहे. भाजप आणि कॉंग्रेस उमेदवार विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने लढे दिले आहेत.

मात्र, काही वर्षात महाराष्ट्र एकीकरण समितीतील (Maharashtra Ekikaran Samiti) बेकी व महाराष्ट्रातील नेत्यांकडून सीमाभागात येऊन म.ए.समिती उमेदवार विरोधात प्रचार केल्यामुळे त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे सभा घेणार आहे. सीमालढ्यासाठी योगदान दिलेले व कारागृहात जाऊन आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभा घेऊ नये, अशी मागणी आहे.

सोशल मिडियावरूनही विरोध सुरु आहे. तरुणांनी महाराष्ट्र नेत्यांना इतरवेळी प्रवेश बंदी घातली जाते. यामुळे २ मे रोजी शिंदे यांच्यावर प्रवेश बंदी घालावी. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर त्यांना रोखावेअशी मागणी केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना सीमाभागात विरोध सुरु झाल्यामुळे पोलिस सतर्क झाले आहेत. समितीकडून आंदोलन आणि स्वरुप याचा कानोसा घेण्यास सुरु केला आहे.

म. ए. समितीविरुद्ध मुख्यमंत्री शिंदेंचा प्रचार

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील बेळगाव लोकसभा आणि निरंजनसिंह सरदेसाई कारवार मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत. मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासह सीमाप्रश्‍न लढ्यासाठी निवडणूक लढवीत आहेत. मात्र, म. ए. समिती उमेदवार विरोधात लढणाऱ्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगाव दौऱ्यावर येत असल्यामुळे विरोध सुरू आहे. म.ए. समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT