Bandh became the basis for the end of drought... 
पश्चिम महाराष्ट्र

बंधारा बनला दुष्काळ हटण्यासाठी आधारवड...

सकाळवृत्तसेवा

दिघंची : दमदार परतीच्या पावसाने माणगंगा नदी प्रवाहित झाली व याचा नदीवरील असणाऱ्या यादववस्ती बंधारा पूर्ण क्षमतेने पाणी अडवल्याने तुडुंब भरला आहे. हा बंधारा शेतकऱ्यांसाठी आधारवड बनला असून शेकडो एकर शेतीची तहान भागणार आहे व दिघांचीचा दुष्काळ हटण्यासाठी थोड्या बहुत प्रमाणात याची मदत होणार आहे. नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर उमटत आहे.

दिघंची गाव तसे माणगंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. गावाला लागूनच मोठे पात्र असणारा ओढा देखील आहे. गावचा ओढा व नदी याचा संगम गावच्या पूर्व दिशेला म्हणजे जुना पंढरपूर रोड येथे होतो. या ठिकाणी ओढा व माणगंगा नदीपात्रातील येणारे पाणी यादववस्ती जवळ बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी पाण्याने काठोकाठ भरल्या आहेत. 

बंधाऱ्याचे वैशिष्ट्ये असे आहे की विविध सिंचन योजनाचे पाणी येथे एकवटले जाऊ शकते. आटपाडी तालुक्‍याचा बंद पाईपाचा असणारा टेंभू कालवा या कालव्याचे पाणी दिघांची ओढ्यात सोडल्यास ते बंधाऱ्यात येऊ शकते तर याच माणगंगा नदीवर असणाऱ्या ब्रिटिश कालीन राजेवाडी तलावामध्ये जिहे-कटापूर व उरमोडीचे पाणी सोडून तलाव भरून ते पाणी माणगंगा नदीत सोडल्यास लिंगीवरे, गिड्डेवस्ती व यादव वस्ती असे तीन बंधारे भरू शकतो. 

दृष्टिक्षेपात दिघंची यादव वस्ती बंधारा

  • सिंचन क्षमता -275 हेक्‍टर 
  • एकूण गाळे - 45 
  • एकूण उंची - 4.5मीटर 
  • प्रकल्पीय पाणीसाठा-0-599 दलघनमी (21.17 दलघफूट) 
  • लोखंडी दारे - 574 
  • बंधाऱ्यांची लांबी-174 मी 
  • बंधारा पूर्ण वर्ष - 2005 

मे मध्ये  सिंचन योजनेने बंधारा भरून मिळावा

आम्हा सर्व शेतकऱ्यांची बंधाऱ्याच्या काठावर शेती आहे. मे मध्ये दुष्काळ जाणवू नये यासाठी कोणत्याही सिंचन योजनेने हा बंधारा भरून मिळावा हीच सर्व शेतकऱ्यांची माफक अपेक्षा. 
- शहाजी यादव, लाभधारक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT