Beating of a soldier in Pathardi 
पश्चिम महाराष्ट्र

जेवणाच्या ताटात माती गेली, जवानास बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : जेवणाच्या ताटात माती गेल्याच्या रागातून माळी बाभूळगाव शिवारातील शिक्षक कॉलनीत काल (ता. 22) दुपारी चौघांनी जवानास मारहाण केली. दरम्यान, सोशल मीडियावर गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. 

या बाबत केंद्रीय राखीव दलातील जवान मच्छिंद्र चंद्रकांत बडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी केतन जाधव, राम जाधव, गौरव पैठणकर व सागर पैठणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी आदींसह दंगल नियंत्रक पथक, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ असा सुमारे शंभर जणांचा फौजफाटा काल (बुधवारी) रात्री सात वाजेपासून आज पहाटे पाच वाजेपर्यंत राबत होता. अखेर पहाटे याबाबत गुन्हा दाखल झाला. 

जम्मू-काश्‍मीर येथे सीआरपीएफच्या 177 बटालियनमध्ये मच्छिंद्र बडे कार्यरत आहेत. मार्चमध्ये ते महिनाभराच्या सुटीवर गावी आले होते. सुटी संपली, मात्र लॉकडाउनमुळे ते येथेच अडकून पडले. 
दरम्यान, शिक्षक कॉलनीतील एका जुन्या बांधकामाजवळ काल दुपारी जेवण करताना मच्छिंद्र बडे व वरील चार आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला.

बडे यांच्यामुळे आरोपी राम जाधव यांच्या ताटात माती गेली. त्या रागातून वरील आरोपींनी बडे यांना मारहाण केली. अक्षय जायभाये याने भांडण सोडविल्यावर सगळे घरी गेले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा वरील चौघांनी बडे यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर चौघेही पसार झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT