पश्चिम महाराष्ट्र

तब्बल ५ किलो १८१ ग्रॅम वजनाच्या गोंडस बाळाचा कोल्हापूरात जन्म

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - येथील पत्की हाॅस्पिटलमध्ये एका मातेने तब्बल ५ किलो १८१ ग्रॅम वजनाच्या गोंडस बाळाला जन्म दिला. अशी गुंतागुंतीची आणि जोखमीची प्रसूती यशस्वी करण्यात विख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की व त्यांच्या वैद्यकीय पथकाला यश आले. स्त्रीरोग उपचार विषयातील हे यश आगळे वेगळे मानले जाते. 

संबधित महिलेचे गरोदरपणात मधुमेहाचे निदान झाले होते. या महिलेचे प्रसूतीवेळी वजन ९४ किलो झाले. त्यामुळे या महिलेचे उपचार व प्रसूती हे एक आव्हान होते.

-  डॉ. सतीश पत्की

महिलांतील स्थुलतेचे वाढते प्रमाण, व्यायामाचा अभाव, जंग फूडचा आहारातील वाढता समावेश, मानसिक ताणतणाव व अनुवांशिकता यामुळे महिलांमध्ये गरोदरपणात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. वाढलेली रक्तशर्करा गरोदरपणात बाळाकडे पोहोचल्यामुळे बाळाचे स्वादुपिंड इन्सुलीन या संप्रेरकाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करते. अशा बाळांचे जन्मावेळचे वजन खूप असते. प्रसूतिशास्त्रात ४ किलोपेक्षा जन्मावेळचे वजन जास्त असल्यास त्याला वेगळे महत्त्व आहे. 

या अवघड शस्त्रक्रियेत डॉ. पत्की यांच्यासह डॉ. उज्ज्वला पत्की, डॉ. श्‍वेता पत्की, डॉ. श्रीस्वरूप कुलकर्णी, डॉ. गिलाणकर यांनी कौशल्यासह योगदान दिले आहे. या बाळाची तब्येत उत्तम असून बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय माळी यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार सुरू आहेत.

अंत्यत कठीण प्रसूती
वजनदार बाळ असलेल्या महिलांची प्रसूती खूप धोक्‍याची असते. त्यातही मधुमेह असलेल्या गरोदर महिलेची प्रसूती कठीण समजली जाते. बऱ्याच प्रसंगी प्रसूतीनंतर गर्भाशयाद्वारे रक्तस्राव होतो व यात प्रसंगी मातेचा मृत्यूही होऊ शकतो. काही प्रसंगी मातेचा जीव वाचविण्यासाठी गर्भाशयसुद्धा काढावे लागते. अशा गुंतागुतीच्या प्रसूतीमध्येही एक वेगळे यश पत्की हॉस्पिटलने मिळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT