the beginning of the tenth examination but big impact student upsenti 
पश्चिम महाराष्ट्र

पेपरला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली ; या पेपरला तब्बल 800 विद्यार्थ्यांनी मारली दांडी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावीच्या पेपरला सुरळीतरित्या सुरुवात झाली आहे मात्र पेपरला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येत मोठी वाढ होत असुन शनिवारी गणित विषयाच्या पेपरला तब्बल 800 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. तसेच परीक्षा केंद्राबाहेर पालकांना गर्दी करु नका अशी सुचना करुन देखिल पालक सामाजिक अंतर न राखता गर्दी करीत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 


अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गुरुवारपासुन दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असुन पहिल्या दिवशी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरला 787 विद्यार्थी गैरहजर राहिले होते तर गणित विषयाच्या पेपरला 800 विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्हासह इतर जिल्हांमध्येही परीक्षेला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्‌या प्रमाणात असल्याचे दिसुन येत आहे. शिक्षण खात्याने विद्यार्थ्याना कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे. तरीही अनेक विद्यार्थी पेपरला दांडी मारत असल्याचे दिसुन येत आहे. 

गणित पेपरला सुरुवात होण्यापुवीं सकाळी 9 वाजल्यापासुन विद्यार्थ्यांची थर्मल स्किनिंग करुन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले. शिक्षण खात्याने केलेल्या सुचनेप्रमाणे विद्यार्थी सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, पालकांकडुन पेपरला सुरुवात होण्यापुर्वी व पेपर सुटण्याच्यावेळी गर्दी केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना करणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. 
सोमवार  विज्ञान विषयाचा पेपर होणार तर बुधवार पासुन सलग दिवस पेपर पार पडणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा-अवघ्या तीन तासांत शाळा रेडी टू टीच ; गावाने श्रमदानातून केली उभी शाऴा...


शिक्षण खात्याने परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आवश्‍यक ती पावले उचलली आहेत. त्यामुळे परीक्षा सुरळीत सुरु असुन विद्यार्थ्यानी गैरहजर न राहता सर्व पेपरना उपस्थित रहावे. गणित विषयाचा पेपरही शांततेत पार पडला असुन इतर पेपरही सुरळीत पार पडतील असा विश्‍वास आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT