रब्बी पीक पेरणीसाठी बैलांच्या साह्याने शेत तयार करताना शेतकरी.  
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : हार नाही मानणार; रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कसली कंबर

यंदाच्या वर्षीही जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामावर पाणी सोडावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : यंदाच्या वर्षीही जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामावर पाणी सोडावे लागले. मात्र शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी आता कंबर कसली असून रब्बी हंगाम तरी आर्थिक अडचणीतून दूर करेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

जिल्हा कृषी खात्याने रब्बी हंगामासाठीची तयारी केली आहे. यंदा ३ लाख १४ हजार हेक्‍टर शेतजमिनीत रब्बी हंगाम साधण्याचे कृषी खात्याचे उद्दिष्ट आहे. रब्बी हंगामातील पेरणीच्या काळातच पावसाला सुरूवात झालेली असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. सद्या हा पाऊस हंगामासाठी पोषक असला तरी पुन्हा अतिवृष्टी झाल्यास रब्बी हंगामातील पेरणी देखील नुकसानीची ठरेल, अशी भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ७९ हजार हेक्‍टर प्रदेशात पेरणी झाली होती. पण बेळगाव जिल्ह्यातील २५ विभागात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

कृषी खात्याने जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार २८५ प्रदेशात रब्बी हंगाम साधला जाण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी ५० हजार ४५० क्विंटल बियाणे, ४५ हजार टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करून दिला आहे. पेरणीची तयारी शेतकरी करीत असतानाच शेतमजुरांचाही भाव वधारलेला असल्याने शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेत मजुरांकडून ३०० ते ३५० रुपये दिवसाची शेतमजुरी मागितली जात आहे. तर सूर्यफुलांच्या बियाणांचा दरही ११० रुपयांवरून १६० रुपयांवर पोहोचला आहे. प्रति किलोला ५० रुपयांची दरवाढ झालेली आहे.

रब्बी हंगाम साधतानाच पावसाला सुरुवात झालेली असल्याने शेतकरी शेतामध्ये पेरणीच्या कामात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जात आहेत.

-शिवनगौडा पाटील, सहसंचालक, कृषी खाते.

पेरणीचे उद्दिष्ट्य

पिक*अपेक्षित पेरणीचे उद्दिष्ट्य (हेक्टरमध्ये)

जोंधळा*१,११,५००

मका*३१,०००

गहू*५२,४५५

हरभरा*१,०६,११०

सूर्यफूल*५,९००

इतर पिके*७,३२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT