आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा द्या; उपायुक्तांना निवेदन sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा द्या; उपायुक्तांना निवेदन

बेनकनहळ्ळीत तरुणाच्या आत्महत्येची घटना अलिकडे घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेनकनहळ्ळी येथील तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पंच कमिटी पदाधिकारी, ग्रांमस्थ आणि नातेवाईकांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे आज (ता.२७) एका निवेदनाद्वारे केलेली आहे.

बेनकनहळ्ळीत तरुणाच्या आत्महत्येची घटना अलिकडे घडली आहे. संजय भरमा पाटील (वय ३१) असे त्याचे नाव असून, २२ ऑक्टोबरला त्याने जीवन संपविले आहे. गावाजवळ हिरोजी मळा असून, तेथील एका झाडाला संजय याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजय याचे एका मुलिवर प्रेम होते, असे समजते. परंतु, मुलिच्या कुटुंबात या प्रेमप्रकरणाताला आक्षेप होता. यातून त्यांनी मुलाला धमकी आणि मारबडव केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने व्यथित संजय याने जीवन संपविल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे याची सखोल चौकशी करावी. सदर युवकाच्या आत्महत्येस संबंधीत संशयित जबाबदार आहेत का? त्याची शहानिशा केली जावी. त्यात तथ्य आढळून आल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला जावा. कठोर शिक्षण त्यांनी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली आहे. शिवाय पाटील कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.

यावेळी ग्रांमस्थ आणि पंचकमिटीने पोलिस उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदनाची प्रत दिलेली आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रांमस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Homes Set on Fire in Bangladesh: बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

BMC Election: महायुतीत नाराजी स्फोट! शिंदे गटात राजीनाम्यांची मालिका, भाजपमध्येही समाज माध्यमावर खदखद

Banking Job Vacancies: बँक ऑफ इंडियात पदभरती; 514 जागांसाठी जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स

PMC Election Nominations : धनकवडी–सहकारनगर कार्यालयात उमेदवारांची गर्दी; ५९ जणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल!

Latest Marathi News Live Update : - अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT