बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर सीमेवर कडक बंदोबस्त  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर सीमेवर कडक बंदोबस्त

कोगनोळी नाक्यावर पोलिस तैनात : शिवसेना नेत्यांवर नजर

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर सोमवारी (ता. १३) कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. त्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १४) बेळगाव बंदची हाक देण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील सीमा तपासणी नाक्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या शिवसेना व अन्य राजकीय मंडळींवर बारीक नजर ठेवण्यात आली असून पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

येथील सीमातपासणी नाक्यावर पोलिसांकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सोमवारी (ता. १३) बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना यांची कोगनोळी नाक्यावर अडवणूक करून परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आले होते.

यावेळी विजय देवणे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मंगळवारी (ता. 14) बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांवर या सीमा तपासणी नाक्यावर कडक लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस उपठाण्याचे एएसआय एस. ए. टोलगी, एस. बी. खोत यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT