belgaum case two interstate thief arrested by police in belgaum today 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात भरदिवसा घरफोड्या करणारे दोघेजण अखेर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : झाडशहापूर येथे पाठलाग करुन पकडण्यात आलेल्या दोघा आंतरराज्य चोरट्यांकडून एकून सात प्रकरणांचा उलगडा झाला आहे. ही जोडी भरदिवसा घरफोड्या करण्यात तरबेज असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोटार, गावठी पिस्तुल असा एकूण तब्बल 51 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

प्रकाश विनायक पाटील (वय 30, मुळ रा. सरस्वतीनगर शहापूर सध्या रा. जरीवाडा साखळी गोवा) आणि नित्य खालीपद मंडल (वय 41, रा. कालीपद पश्‍चिम बंगाल) अशी संशयितांची नावे आहेत. रविवार (6) झाडशहापूर येथे घरफोडी करताना ग्रामस्थ व पोलिसांनी पाठलाग करुन वरील दोघांना अटक केली होती. पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली, त्यावेळी त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

शहरातील बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यासह एपीएमसी, कॅम्प, मारिहाळ, माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एकून सात घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 42 लाख 40 हजार रुपये किमतीचे 848 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आठ लाख रुपये किमतीची मोटार, साठ हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्तल व पाच जिवंत काडतुसे असा एकून सुमारे 51 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त डॉ. विक्रम आमटे गुन्हे व वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त चंद्रशेखर निलगार, ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त जी. वाय. गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT