rain sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव शहरासह ग्रामीण भागात आज जोरदार पावसाला सुरुवात झाली.

सकाळी मुसळधार, दुपारनंतर जोर ओसरला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव शहरासह ग्रामीण भागात आज जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत पावसाची संततधार कायम होती. मात्र, दुपारनंतर पाऊस गायब झाला. दिवसभर हवेत गारठा होता. पावसामुळे बाजारपेठेतील गर्दी काही वेळ कमी झाली होती. मात्र, पाऊस गेल्यानंतर पुन्हा गर्दी वाढली. जुलैच्या पाच दिवसांत सरासरी २१.७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनला सुरुवात होऊन महिनाभरानंतर अखेर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली. गेल्या चार दिवसांपासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने गती वाढविली आहे. कालही (ता. ४) कधी जोरात तर कधी संततधार पाऊस झाला. मंगळवारीही काही तास जोरात पाऊस तर काही वेळ रिपरिप पाऊस झाला. मात्र, दुपारी तीननंतर पाऊस पूर्णपणे गायब झाला. दिवसाच्या पहिल्या टप्प्यात का असेना पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.

दरम्यान, १ जुलै रोजी १.७१ मिमी, २ जुलैला ३.३१ मिमी, ३ जुलैला १.४६ मिमी, ४ जुलै २.०६ मिमी तसेच ५ जुलैला १३.१९ मिमी पाऊस झाला. जुलै महिन्यात गेल्या पाच दिवसात सरासरी २१.७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अथणीत ११.२ मिमी, बैलहोंगलमध्ये १०.४ मिमी, बेळगावमध्ये २७.१ मिमी, चिक्कोडीत ३१.०७ मिमी, गोकाकमध्ये ७.७ मिमी, हुक्केरीत १२.२ मिमी, कागवाडमध्ये २७.८ मिमी, खानापूरमध्ये ७१.१ मिमी, कित्तूरमध्ये २४.९ मिमी, मुडलगीत १०.१ मिमी, निपाणीत ४६.६ मिमी, रायबागमध्ये १.० मिमी, रामदुर्गमध्ये १३.०७ मिमी व सौंदत्तीत ८.६ मिमी पावसाची गेल्या पाच दिवसात नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : शिर्डीत हनुमान जयंतीला ताकदीचा जल्लोष! 125 किलो गोटा उचलण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT