पश्चिम महाराष्ट्र

Live Update : बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज

सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 3 प्रभागात विजय मिळवला आहे.

स्नेहल कदम

Belgaum Election Result 2021 Live Update : राजकीय पटलावर दीर्घकाळ परिणाम करणारा बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत कमी मतदान झाल्याने उत्सुकता कमालीची ताणली गेली असून, ५८ प्रभागांतील ३८५ उमेदवारांपैकी कोणाला मतदारांनी आपला कारभारी म्हणून निवडला आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, वा सत्तेच्या जादुई आकड्यापर्यंत पोचण्यासाठी जनतेने कोणाला कौल दिला आहे, या साऱ्या एक आठवड्यापासून ताणल्या गेलेल्या प्रश्‍नांची उकल आज होणार आहे. पाहा लाइव्ह अपडेट ...

  • बेळगावात गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

भाजप'ने एकमताने बेळगाव महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज ही मतमोजणी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन होत आहे. मतमोजणी परिसरात प्रशासनाने जमावबंदीचे आदेश देऊनही स्थानिकांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.

'भाजप'ने गाठली 34 जागांची मॅजिक फिगर

बेळगावात 'भाजप'ला ३४ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 'भाजप'ने एकमताने बेळगाव महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत झाले आहे. यामध्ये भाजप 34, महाराष्ट्र एकीकरण समिती 3, काँग्रेस 8, अपक्ष 8, एमआयएमने 1 जागा मिळवण्यत यश आले आहे.

  • बेळगावात 'भाजप'ला स्पष्ट बहुमत; कॉंग्रेसची पिछेहाट

बेळगाव पालिकेला जवळ जवळ एकहाती सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निवडणूकीत भाजपाने बहुमताचा जादुही आकडा (३०) पूर्ण केला आहे. त्यामुळे बेळगाव पालिकेवर 'भाजप'ची सत्ता येणार हे स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत बेळगावात भाजपला 30, काँगेस 7, मए समिती 2, एमआयएमला 1 जागा मिळाली आहे. कॉंग्रेसमध्ये मात्र निराशा पहायला मिळत आहे.

  • बेळगावात 'भाजप'ची जोरदार मुसंडी

बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंत भाजपचे 22 तर काँगेस 4 तर महाराष्ट्र एकीकरण समितीला आता पर्यंत 3 जागा मिळाल्या आहेत. बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर येत आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या 'भाजप'ला आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे.

  • बेळगावात भगवा फडकवणार, संजय राऊत यांचा विश्वास

बेळगावमध्ये मराठी लोक एकत्र झालेले आहेत. जो भगवा फडवकला होता, पुन्हा एकदा फडकणार असल्याचे वातावरण सध्या बेळगावात आहे. ते पाहता बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती व त्यांचे कार्यकर्ते मिळून महापालिकेवर भगवा फडकवतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

  • कर्नाटक सरकारने अनेक उपद्व्याप केले- राऊतांचा आरोप

कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळू नये म्हणून बरेच उपद्व्याप केले आहेत. त्रिशंकू परिस्थिती झाली तर काय करता येईल यासाठी अनेक उपद्व्याप झाले आहेत. मात्र बेळगावची जनता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आपले मत व्यक्त करेल आणि ते मत महाराष्ट्राच्या बाजूनेच असेल असे संजय राऊत यांनी सांगितले.

प्रभाग 47 मधून शोभा पाटील विजयी झाल्या असून माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील कॉंग्रेस उमेदवार शकिला मुल्ला विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग 45 च्या रूपा चिकलदींनीसह प्रभाग 28 मधील माजी नगरसेवक रवी धोत्रे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 42 मधून 'भाजप'चे अभिजित जवळकर विजयी झाले आहेत.

बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने (aimim candidate) खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडोळकर विजयी झाले आहेत. (Belgaum election results 2021) सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 3 प्रभागात विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक 16 मधून राजू भातकांडे, 40 मधून रेश्मा कामकर, प्रभाग 18 मधून एमआयएमचे शाहिदखान गौसखान पठाण तसेच बाबजान मतवाले प्रभाग क्रमांक, प्रभाग क्रमांक 11 मधून समीउल्ला माडीवाले, प्रभाग क्रमांक 29 मधून नितीन जाधव विजय झाले आहेत.

पहिल्या फेरीचे मतमोजणी पूर्ण होण्याचा मार्गावर असून पहिल्या फेरीत काँग्रेस व भाजपला यश मिळाले असून उर्दू भाषिक उमेदवार अधिक संख्येने विजयी झाले असून लवकरच दुसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित मानला जात असलेल्या चार ठिकाणी समितीचा पराभव झाला असून आतापर्यंत भाजप 4, काँगेस 4, एमआयएम 1, समिती 1 व 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT