belgaum father death rajasthan government karnataka government corona virus 
पश्चिम महाराष्ट्र

"त्याच्या' वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी थेट राजस्थान सरकारला हाक 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - बेळगावात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेल्या एका राजस्थानी व्यक्तीच्या वडीलांचा मृत्यू झाला. वडीलांच्या अंत्यदर्शनाच्या ओढीने त्याने राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जिल्हा प्रशासनानेही राजस्थानला जाण्याची परवानगी दिली.

राजस्थान सरकारशी चर्चा करून त्याला त्याच्या गावी पोहोचण्यासाठी आवश्‍यक परवानगी मिळविली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांची परवानगी घेऊन त्याला रविवारी (ता.12) बेळगावातून पाठविण्यात आले. त्याच्या प्रवासासाठी खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून त्या वाहनाचे 30 हजार रूपये भाडे देण्याचे त्या व्यक्तीने मान्य केले आहे. त्याच्या सोबत आणखी दोघेजण राजस्थानला जाण्याच्या तयारीत होते, पण प्रशासनाने केवळ एकट्याचीच रवानगी केली आहे. बेळगावहून सुमारे 1500 किमी अंतरावर त्या व्यक्तीचे गाव असून त्याला सोडण्यासाठी गेलेल्या वाहनाचा 3 हजार किमी प्रवास होणार होता. त्यामुळे राजस्थानला जाणे व तेथून परत येण्याचे भाडेही वाहनचालकाने आकारले. 

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंगळूर येथून राजस्थान व मध्यप्रदेश येथे जाणाऱ्यांना बेळगावात स्थानबद्ध केले. गेल्या 20 दिवसांपासून त्यांचे बेळगावात वास्तव्य आहे. नेहरूनगर येथील समाजकल्याण खात्याचे वसतिगृह तसेच हालभावी येथील मोरारजी देसाई शाळेच्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले आहे. बेळगावातून त्यांना त्यांच्या राज्यात पाठविले जाण्याची मागणी सातत्याने ते करीत आहेत. पण लॉकडाऊन मागे घेतल्याशिवाय त्यांना सोडणार नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे. 

अल्पोपहार व भोजनावरून त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी केलेला वाद, भोजनावरून दोन गटात झालेली हाणामारी यामुळे हे राजस्थानी व मध्यप्रदेशचे नागरिक सातत्याने चर्चेत राहिले. त्यामुळेच जिल्ह्याचे पालक सचिव अतिक यांनी नेहरूनगर येथे भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला, मात्र त्याना 15 एप्रिलनंतर त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णयही जाहीर केला. यामुळे ते सर्वजण खूष झाले होते. नेहरूनगर येथील वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या राजस्थान येथील एका व्यक्तीच्या वडीलांचे रविवारी निधन झाले. त्याची माहिती त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिली. यावेळी त्याने मला राजस्थानला पाठवा अशी विनंतीही केली. महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर राजस्थान सरकारशी चर्चा करून त्या व्यक्तीला राजस्थानमध्ये प्रवेश देण्याबाबतची रितसर परवानगी घेण्यात आली. त्यानंतर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यानीही परवानगी दिली. राजस्थानला जाण्यासाठी खासगी वाहन हा एकच पर्याय उपलब्ध होता पण त्यासाठी भाडे आकारणी जास्त होणार होती. सर्व भाडेरक्कम देण्याची तयारी त्या व्यक्तीने दाखविली, त्यामुळे मग एक वाहन भाडेतत्वावर घेऊन प्रशासनाकडूनच त्याला राजस्थानला पाठविण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT