Belgaum husband murder by strangles wife marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

'व्हॅलेंटाईन डे' च्या पूर्वसंध्येला पतीकडून पत्नीचा खून..

सकाळ वृत्तसेवा

 बेळगाव : पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. कविता परशुराम पिसे (वय ३०, मूळ रा. गुलबर्गा, सध्या रा. विजयनगर, बेळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. संशयित परशराम पिसे हा एक राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे.

परशराम आणि कविता यांचे लग्न होऊन आठ वर्षे झाली. परशराम हा विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील असून नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब विजयनगर येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहते. त्यांना सहा वर्षाची आणि सहा महिन्याची मुलगी आहे .

रागाच्या भरात पतीने केले हे कृत्य

गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास पत्नीने परशरामला बँकेतून घरी बोलावून घेतले. एलके जीमध्ये शिकणाऱ्या मुलीला शाळेतून आणण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर दोघांचे भांडण विकोपाला गेले. रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळला. दुपारी २ वाजल्यापासून घरी तो आणि सहा महिन्याची मुलगी होती. पत्नी खाली पडल्याने तोही अस्वस्थ बनला. सायंकाळी काही उशीर तो घरी बसून होता. मुलींचे रडणे असह्य झाल्याने त्याने आपल्या घरी विजापूरला तसेच सासरवाडीला फोन करून पत्नीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले.

 तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असे तो सांगत होता

यावेळी त्याच्या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परंतु डॉक्‍टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. दुपारीच तिचा मृत्यू झाला होत.प्रथमदर्शनीच गळा दाबल्याचे व्रण आढळून आले आहेत. आधी पोलिसांनाही तो झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचेच सांगत होता. परंतु, पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कबूल केले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. कॅम्पचे प्रभारी पोलीस निरीक्षक धीरज शिंदे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Special Train : नांदेडसाठी विशेष रेल्वे! दिल्ली, चंदीगड, मुंबईतून सोय; वेळापत्रक असे, श्री गुरु तेग बहादूर साहेबजी शहिदी समागम वर्षानिमित्त सोय

CM Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर, रायगड-पेण बनणार विकास केंद्र

Anti-Sikh Riots Case : शीख विरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमार यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, तरीही तुरुंगातून होणार नाही सुटका

Latest Marathi News Live Update : राज्यातील महापालिकांच्या २९ महापौर पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले

Smartphone Addiction : मोबाईल जवळ, नाती दूर! महाराष्ट्रातील ८५ टक्के घरांत स्मार्टफोनचा शिरकाव; संवाद मात्र हरवला

SCROLL FOR NEXT