bjp sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जारकीहोळींनी वाढवली भाजपची चिंता

लखन यांच्या उमेदवारीसाठी आग्रही ः सावध पवित्रा

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने एका जागेवर उमेदवार उभा करण्याचे निश्र्चित केले आहे. भाजपकडून पहिल्या जागेवर विद्यमान सदस्य महांतेश कवटगीमठ यांची उमेदवारी निश्र्चित मानली जात आहे. मात्र, दुसऱ्या जागेसाठी लखन जारकीहोळी यांना उमेदवारी देण्याची मागणी जारकीहोळी बंधूंनी लावून धरली आहे. मात्र, लखन यांना उमेदवारी दिल्यास कवटगीमठ यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भाजपची चिंता वाढली आहे.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी आपले बंधू लखन यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. गोकाक, अरभावी मतदारसंघातील तालुका पंचायत, ग्रामपंचायत, नगर पालिका, नगर परिषद सदस्यांच्या सभा घेऊन वातावरणनिर्मिती सुरु केली आहे. त्यांनी दिल्लीवारीही केली आहे. जिल्‍ह्यातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घेण्याची ग्वाही त्यांनी पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष

लढण्याची तयारी लखन यांनी केली आहे. त्‍यामुळे, भाजपची गोची झाली आहे. लखन यांना उमेदवारी दिल्यास पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

दुसरीकडे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर जारकीहोळी कुटुंबीय केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळेस लखन जारकीहोळी भाजपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत विजयी झाले तर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार बंधूंना आमदार होण्याचा मान मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT