पश्चिम महाराष्ट्र

स्टार एअरवेजतर्फे सहा सप्टेंबरपासून बेळगाव - मुंबई विमान सेवा 

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर - स्टार एअरवेजच्यावतीने सहा सप्टेंबरपासून बेळगाव ते मुंबई हवाई सेवेला प्रारंभ होणार आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्टार एअरवेज हवाई सेवेचे जाळे विस्तारत आहे. बेळगाव - मुंबई नवी हवाई वाहतूक प्रवाशांच्या सोयीची ठरणार आहे. 

स्टार एअरवेज बंगळूर, हुबळी, अहमदाबाद व तिरुपती याठिकाणी हवाई सेवा देत आहे. जानेवारीमध्ये हवाई सेवेला प्रारंभ करुन अल्पावधीत विविध हवाई मार्गावर दर्जेदार हवाई सेवा दिली जात आहे. 

स्टार एअरवेजचे सीईओ सिमरन सिंह तिवाना म्हणाले, ""बेळगाव हे व्यवसायाचे व शिक्षणाचे केंद्र स्थान आहे. म्हणूनच ही सेवा आंतरराष्ट्रीय पर्यटक, विद्यार्थी, उद्योजकांसाठी सोयीची ठरणार आहे. ऑनलाईन तिकिट विक्री मुख्य पोर्टलवर लवकरच उपलब्ध होईल. अत्यंत कमी वेळेत ग्राहकाभिमुख सेवेमुळे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रुप बुकींगवर वीस टक्के डिस्काउंट, विमानातील दोन सिटस्‌मधील अंतर, फ्रि बॅगज, ऑन बोर्डवर डिंक्‍स, स्नॅक्‍स, अत्याधुनिक सुविधा, सोयीस्कर पेमेंट पर्याय, युएनएम सेवा तसेच इतर सेवांमुळे स्टार एअरवेज हवाई सेवेतील लौकीकपात्र ठरली आहे.'' 

बेळगावच्या प्रवाशांना देशातील इतर शहरात प्रवास करताना स्टार एअरवेजला प्राधान्य दिले आहे. बेळगाव - अहमदाबाद दरम्यानच्या सेवेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजवर या मार्गावर 85 टक्के प्रतिसाद मिळाला. उत्तर कर्नाटकच्या म्हणजे हुबळी, धारवाड, बेळगावी, विजापूर तर पश्‍चिम महाराष्ट्रातून म्हणजे कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्हा व गुजरातमधील अहमदाबाद विभागातून हवाई सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भविष्यात अन्य विमानांची दुरुस्तीही केली जाणार असून याचा देशातील विविध विमान कंपन्यांना लाभ होणार आहे. 

बेळगावला हवाई सेवेचे केंद्र बनविणार आहे. संजय घोडावत ग्रुप अविभाज्य घटक असून हा एक विविधतापूर्ण भारतीय उद्योग समुह आहे. एविएशन, ग्राहकोपयोगी उत्पादने, शैक्षणिक दर्जा, फुलोत्पादन, अन्न प्रक्रिया, खनिज उत्खनन, बांधकाम व टेक्‍स्टाईलमध्ये जवळपास दहा हजार लोक एसएसजीमधील कार्यरत आहेत. स्टार एअरवेजच्या सहा सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या बेळगाव-मुंबई हवाईसेवेलाही चांगला प्रतिसाद मिळेल. 
- संजय घोडावत,
अध्यक्ष, संजय घोडावत ग्रुप 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT