belgaum municipal corporation employee corona virus infected 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव महापालिकेत माजली खळबळ : कर्मचाऱ्याला झाली कोरोनाची लागण...

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे कोनवाळ गल्लीतील उत्तर उपविभाग १ हे कार्यालय बंद करण्याचा आदेश आयुक्त के एच जगदीश यांनी दिला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सहायक महसूल अधिकारी, महसूल निरीक्षक यांच्यासह दहा जणांना क्वारन्टांईन होण्याची सूचना देण्यात आली आहे.

गेली तीन महिने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारन्टांईन करण्याचे महत्वाचे काम महसूल विभागाचे कर्मचारी करीत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. आता पालिका कर्मचारीच बाधित झाल्याने पुन्हा हा मुद्दा  चर्चेत आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवडाभरापासून महापालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे पण कोरोना विभागीय कार्यालयात घुसला आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या बालेकिल्ल्याला पोटनिवडणुकीत सुरुंग, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

'त्यांना ओरडायचं ठरवलेलं, पण...' संजीव कुमारला शेवटचंही भेटू शकले नाहीत सचिन पिळगांवकर, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT