नरगुंदकर भावे चौकात होणार नॉन व्हेंडिंग झोन sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : नरगुंदकर भावे चौकात होणार नॉन व्हेंडिंग झोन

बेळगाव शहरातील सर्वात वर्दळीचा नरगुंदकर भावे चौकात नॉन व्हेंडींग झोन तयार करण्यात येणार आहे.

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : बेळगाव शहरातील सर्वात वर्दळीचा नरगुंदकर भावे चौकात नॉन व्हेंडींग झोन तयार करण्यात येणार आहे. यासाठी तेथे २२ बाय ४ मीटर आकाराचे तीन बाजारकट्टे बांधण्यात येणार आहेत. त्यावर शेड तयार करण्यात येणार आहे. त्या बाजारकट्ट्यांवर ७५ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शनिवारी यासंदर्भात नरगुंदकर भावे चौक येथे पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात आमदार अनिल बेनके, महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी, सहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे आदी सहभागी झाले होते. नरगुंदकर भावे चौक हा शहरातील सर्वात महत्वाचा चौक आहे. या चौकाला ऐतिहासीक महत्व आहे. पण याच चौकात दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या चौकात भाजीपाला तसेच अन्य साहित्याची विक्री करणाऱ्या बैठ्या विक्रेत्यांची संख्या जास्त आहे.

तेथे दुचाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात लावली जातात. त्यामुळे त्या चौकाचे सौंदर्यही हरविले आहे. भाजीपाला व अन्य विक्रेत्यांकडून तेथे कचरा टाकला जातो, त्यामुळे तेथे मोकाट जनावरांचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळेच त्या चौकाची स्थिती बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. तीन महिन्यापूर्वी महापालिकेत त्यासंदर्भात एक बैठक झाली होती. त्यावेळी नरगुंदकर भावे चौकात बाजारकट्टे बांधण्याचा निर्णय घेतला होता.

जमिनीपासून चार फूट उंच असे बाजारकट्टे बांधण्यात येणार आहेत. शिवाय तेथील पार्कींगला शिस्तही लावली जाणार आहे. तेथील दत्तमंदीरच्या मागील बाजूला महापालिकेच्या मालकीची जागा आहे. त्या जागेत बाजारकट्टे बांधण्यासाठी महापालिकेने याआधी आरेखनही केले आहे. शनिवारी तेथे भेट देवून पाहणी करण्यात आली. बाजारकट्टे बांधण्याच्या कामाला सुरूवात करण्याची सूचना आमदार बेनके यानी दिली. महात्मा फुले भाजी मार्केट येथेही आमदार, आयुक्त व अभियंत्यांनी भेट दिली.

तेथील भाजी मार्केटमधील ५९ कट्टे रिकामे आहेत. तेथील कांदा व्यापारी तसेच अन्य विक्रेते भाजी मार्केटच्या बाहेर बसतात. त्यांनाही तेथील रस्त्यावरून भाजी मार्केटमध्ये स्थलांतरीत करण्याबाबत चर्चा झाली. भाजी मार्केटमधील कट्ट्यांचा लिलाव जानेवारी महिन्यात झाला होता. त्यावेळी त्या कट्ट्यांसाठी भाडेकरूही मिळाले होते. पण त्यानी अनामत रक्कम व चार महिन्याची आगावू भाडे रक्कम न दिल्याने त्यांचा भाडेकरार रद्द करण्यात आला. त्या गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार आहे. पण ते कट्टे तेथील कांदा व अन्य व्यापाऱ्यांना देता येतात का? याची चाचपणी महापालिकेकडून केली जणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

IND vs NZ, 4th T20I: न्यूझीलंडची दणक्यात सुरुवात, नंतर भारतीय गोलंदाजांनीही दाखवला क्लास; पण तरी विजयासाठी विक्रमी धावांचं लक्ष्य

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Nagpur News : दादाची आस्थेने विचारणा! गावात सगळ्यांनी जेवण केलं का? ‘चानकी’ गावासाठी ‘दादा’ ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT