belgaon sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : रुंदीकरणाला विरोध नाही, शेतकऱ्यांचे नुकसान नको

शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाला आपला विरोध नसून तेथे होणाऱ्या अन्य गोष्टींना विरोध असल्याचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. तसेच येथे असलेल्या टोल नाक्यावर अनेक युवकांनी कर्ज काढून उद्योग, व्यवसाय स्थापन केला आहे. हे सर्व व्यवसाय रुंदीकरणात बंद पडणार आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाला आपला विरोध नसून तेथे होणाऱ्या अन्य गोष्टींना विरोध असल्याचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिले.

चिक्कोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची सुपीक जमीन न घेता टोलनाक्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर असलेल्या माळरानातील जमीन यासाठी घ्यावी. या ठिकाणी युवकांनी अनेक उद्योगधंदे सुरू केले आहेत. यासाठी शासनाने टोलनाका व इतर ऑफिस अन्यत्र करावी.

यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष चोनाप्पा पुजारी, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले, युवराज माने, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सचिन माने, दादासाहेब माने, बाळासाहेब हादिकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील, विजय मोहेरवाडे, मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनीर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वड्डर, संतोष चौगुले, अमोल मल्लाडे, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सचिव कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ते पण आपल्यातलेच! मुंबईतील 'कबुतरां'च्या वादात PETA ची उडी; Video तून करतायेत जनजागृती

Latest Marathi News Live Update: कृषी समृद्धी योजने'साठी नवीन ' लेखाशिर्ष' मंजूर

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

SCROLL FOR NEXT