Belgaum News 
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : हिंडलग्यात २१ लाखांची घरफोडी

निवृत्त जवानाचे फोडले घर; ४०० ग्रॅम सोने, एक किलो चांदी लंपास

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विजयनगर-हिंडलग्यामध्ये चोरट्यांनी निवृत्त जवानाचे घर फोडून २१ लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना आज (ता. ३०) उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सुमारे चारशे ग्रॅम सोने आणि एक किलो चांदी पळविली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, हिंडलग्यातील विजयनगर एमईएस (मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिस) कॉलनीमध्ये निवृत्त जवान राजेंद्र वामन हळदणकर यांच्या मालकीचे घर आहे. या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी किमती ऐवज लांबविला. यामध्ये सोने-चांदीच्या विविध दागिन्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील तिजोरी फोडली. तिजोरीतील सोन्यासह चांदीचे दागिने घेऊन तेथून पळ काढला.

घरमालक हळदणकर निवृत्त जवान आहेत. कामानिमित्त बुधवारी (ता. २९) ते बाहेर गेले होते. कुटुंबामधील इतर सदस्य शाळेकडे कामानिमित्त गेले होते. सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारे सर्वजण घरामधून बाहेर पडले व दुपारी चारच्या सुमारास परतले.

हळदणकर यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्यात आल्याचे व विविध साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. तिजोरीची पाहणी केल्यानंतर त्याचाही लॉक मोडल्याचे दिसले.

तिजोरीतील दागिनेही चोरट्यांनी लांबिवले. त्यासाठी या संदर्भात कॅम्प पोलिसांना कल्पना दिली. यानुसार घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी पचंनामा केला. यासंदर्भात हळदणकर यांचा जबाब नोंदविला आहे.

त्यामध्ये सुमारे ४०४ ग्रॅम वजनाचे विविध दागिने लंपास झाल्याची फिर्याद दिली आहे. तर १०९० ग्रॅम चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे याविरोधामध्ये कॅम्प पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. कॅम्प पोलिस पुढील तपास करत आहेत.

भरदिवसा धाडसी घरफोडी

हिंडलग्यात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. शिवाय चोरट्यांनी अचूक डाव साधल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बंद घर आणि आजूबाजूला कोणी नसल्याचे हेरून सकाळी दहा ते दुपारपर्यंत कार्यभाग उरकला आहे. भरदिवसा २१ लाखांची चोरी झाल्याने भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT