Agitation Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : सुवर्णसौध परिसरात तब्बल एक महिना 144 कलम लागू

किरकोळ विषयावर सुवर्णसौध परिसरात आंदोलन करून परिसर वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - किरकोळ विषयावर सुवर्णसौध परिसरात आंदोलन करून परिसर वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरात आजपासून (ता. २४) एक महिना म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत 144 कलम जारी करून जमावबंदीचा आदेश पोलीस आयुक्तांनी आज (ता.२४) बजाविला आहे. सुवर्णसौध हितदृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करून संघटना, संस्था किंवा व्यक्तीला आंदोलन करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हालगा-बस्तवाड परिसरात सुवर्णसौध असून, दक्षिण दिशेला मुख्य प्रवेशमार्ग आहे. प्रवेशमार्गापुढे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यावरून नियमित वाहतूक असते. त्याठिकाणी किरकोळ विषयावरून आंदोलन, निदर्शने व ठिय्या आंदोलन केल्यास वाहतुकीवर परिणाम होऊ शकते. यामुळे 144 कलम जारी करत निर्बंध घोषित केले आहे. आजपासून (ता.24) निर्बंध घोषित केले असून, 23 ऑक्टोबरपर्यंत कायम असेल. यासाठी सुवर्णसौध पुढे आंदोलनाला मज्जाव असेल. सातत्याने विविध संघटना नागरी समस्याबाबतचे विषय घेऊन सुवर्णसौध परिसरात आंदोलन करत आहेत. यामुळे वास्तूच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. यामुळे याबाबत महत्वाचा निर्णय घेऊन १४४ कलम पोलिस आयुक्तांकडून घोषित करण्यात आला आहे.

सुवर्णसौध परिसरात निर्बंध का?

* पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून नियमित भरधाव वाहतूक

*आंदोलकांमुळे महार्गावरून जीवनावश्‍यक वस्तूंची वाहणुकीवर परिणाम होण्याची भिती

* सुवर्णसौधमध्ये विविध २४ कार्यालय असून, कार्यालयाचे कामकाज चालविणे अवघड

* शहरात महत्वाचे रुग्णालये असून, रुग्णांची ने आण किंवा वैद्यकीय उपचारावर परिणाम होण्याची भिती

* सुवर्णसौध परिसरात हालगा-बस्तवाड, के. के. कोप्पसह विविध गावे भाषेच्या विषायवर संवेदनशिल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT