Belgaum youth mandar kolhapur cutting water initiative first in the country 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावच्या युवकाचा "कटींग पाणी' देशात प्रथम 

सतीश जाधव

बेळगाव  - शहापूर येथील युवकाने शहरात "कटींग पाणी' नावाने चालविलेल्या मोहिमेला केंद्र सरकारने प्रथम क्रमांक दिला आहे. यामुळे बेळगावचे नाव सर्वदूर पसरले आहे. शहापूर, होसूर येथील मंदार कोल्हापूरे असे या युवकाचे नाव आहे. यासाठी देशभरातील सात जणांची निवड करण्यात आली असून यामध्ये मंदार यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन विभागातर्फे "वॉटर हिरोज-शेअर युवर स्टोरी' नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पाणी बचतीसाठी आपण केलेल्या उपाययोजनांची माहिती ई-मेलच्या माध्यमातून मागविण्यात आली होती. मंदार यांनी ऑक्‍टोंबरमध्ये ई-मेलद्वारे माहिती कळविली होती. यासंबंधी जानेवारी महिन्यात त्यांना प्रथम क्रमांक आला असल्याचा ई-मेल आला आहे. यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले असून रोख रक्कम देण्यात येणार आहे.

मंदार कोल्हापूरे यांचे बेलगाम फुडीज नावाचे पेज आहे. यातून ते बेळगाव परिसरातील फुड संबंधी अपडेट देत असतात. त्यांनी बेळगावच्या हॉटेल मालकांशी चांगले नाते तयार केले आहे. याच हॉटेलमध्ये त्यांनी "कटींग पाणी' मोहीम चालविली आहे. शहरातील हॉटेलमध्ये ग्राहक आल्यानंतर वेटर त्यांना ग्लास भरून पाणी देतो. काही ग्राहक थोडं पाणी पितात. बाकीचे पाणी फेकून द्यावे लागते. यामुळे पाण्याची नासाडी होते. ते न करता, सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी भरून द्यावा, त्यांना पाणी लागल्यानंतर ते पुन्हा घेतील. यासंबंधीची जागृती त्यांनी हॉटेलमध्ये सुरु केली आहे. जानेवारी 2020 पासून या मोहिमेला सुरुवात केली असून कोरोनामुळे काही महिने ही मोहीम रखडली. जानेवारीपासून मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. याची माहिती त्यांनी ई-मेलद्वारे केंद्र सरकारला दिली होती. या मोहिमेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. केंद्र सरकारने माय गव्हरमेंट या वेवसाईटवरून देखील याची माहिती दिली आहे.

 
हॉटेलमध्ये पाण्याची नासाडी होते. पाण्याची बचत व्हावी यासाठी "कटींग पाणी' मोहीम राबविली. केंद्र सरकारने "वॉटर हिरोज-शेअर युवर स्टोरी' नावाची स्पर्धा आयोजिली होती. त्यासाठी ऑनलाईन माहिती पाठविली. त्यात माझ्या मोहिमेला प्रथम क्रमांक मिळाला. ही अभिमानाची गोष्ट आहे.

-मंदार कोल्हापूरे, शहापूर 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ENG 5th Test: ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडच्या गोलंदाजांची काढली हवा; शतक झळकावले, असा पराक्रम केला जो जगात फक्त पाच जणांना जमला

Ram Shinde: कोल्हेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ: विधान परिषदेचे सभापती राम शिंदे; जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार!

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा खटला ९२ वर्षीय न्यायाधीशांसमोर, अमेरिकेत जज निवृत्त का होत नाहीत? वयोमर्यादेची अटच नाही

Vaibhav Suryavanshi चा हूक शॉट अन् उत्तुंग षटकार; आफ्रिकन समालोचकाची रिअ‍ॅक्शन व्हायरल, असं तो काय म्हणाला? Video

Pimpri News : पिंपरीत एबी फॉर्मच गहाळ; निवडणूक अधिकारी दोषी

SCROLL FOR NEXT