student sakal
पश्चिम महाराष्ट्र

अंडी व चिक्की वितरण योजनेला मोठा प्रतीसाद ८५ टक्के विद्यार्थ्यांकडून अंडी खाण्यास प्राधान्य

अंडी देण्याच्या योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमधील कुपोषितपणा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराबरोबर अंडी देण्याच्या योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्यातील ८५ टक्के विद्यार्थी अंडी खाण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्षातील 46 दिवस अंडी, केळी व चिक्की वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सरकारने सुरुवातीला ज्या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी अंडी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सुरूवातीला राज्यातील सात जिल्ह्यामधील 14 लाख विद्यार्थ्यांना अंडी वितरणाचा लाभ मिळत होता. मात्र राज्यातील सर्व जिल्हातील विद्यार्थ्यांना अंड्यांचा लाभ मिळावा अशी मागणी वाढू लागल्याने या योजनेचा राज्यभर विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी राज्यातील अनेक शाळांमध्ये अंडी व चक्की वितरण करण्यास सुरुवात झाली तेंव्हा पासून योजनेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराबरोबर विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यातील जैन व इतर समाजाने या निर्णयाला विरोध केला होता. तसेच काही ठिकाणी जैन समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर ठिक ठिकाणी आंदोलन झाल्यामुळे अंडी वितरणाचा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र सध्या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ही योजना यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये बेळगाव, विजापूर जिल्ह्यासह इतर जिल्हात कुपोषित मुलांची संख्या अधिक आहे. मात्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्याबरोबरच त्यांना अंडी वितरण केले जात असल्याने कुपोषितपना कमी होण्यास मदत होणार आहे.

सुरुवातीला फक्त माध्यान्ह आहार दिला जात होता मात्र गेल्या काही वर्षांपासून आहाराबरोबरच क्षीरभाग्य योजनेंर्गत आठवड्यातून दोन वेळा दुधाचे वितरण केले जात आहे. त्याचाही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून वर्षातील 46 दिवस अंडी देण्याचा निर्णय विद्यार्थ्याना लाभदायक ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सदृढपना वाढण्यास मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया

मुलांमधील कुपोषितपणा दूर करण्यामध्ये अंडी महत्त्वाचा घटक ठरू शकतात त्यामूळे विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र श्रावण महिन्यात अनेक विद्यार्थांनी अंडी खाण्याकडे पाठ पाठवली होती. त्यामुळे चिक्की व केळी याना मागणी वाढली होती. त्याचप्रमाणे दसऱ्यामध्येही अंड्यांच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे.

मिलिंद देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: माधुरीचं काय चुकलं? पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायची सुमित्रा हत्तीण, काय आहे इतिहास?

शाहरुख-दीपिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाली एफआयआर, नक्की काय आहे प्रकरण?

Ganesh Chaturthi 2025: एकादंतासमोर राशींनुसार करा 'या' मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

Dada Bhuse : ‘माझं गाव, माझी शाळा’ थीममध्ये शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश आरास

Latest Marathi News Updates : नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT