Beware, leopard has come to the gate of Sangli ..! 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान, बिबट्या आला सांगलीच्या वेशीवर..!

जयसिंग कुंभार

सांगली : बिबट्या आता सागरेश्‍वर अभयारण्यात म्हणजे अगदी सांगलीच्या वेशीवरच आला आहे. खरं बिबट्याचा वावर दाट जंगलात नव्हे तर त्याच्या काठावर असतो. कुत्री, मुंगूस, कोंबड्या, शेळ्या, रेडकं असं त्याचं अन्न. त्याच्या शोधात बाहेर पडताना शिराळा तालुक्‍यातील अनेक गावांमधील ऊस फडांमध्ये बिबट्याचा अनेकदा वावर दिसून आला होता. चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून 60-70 किलोमीटरच्या परिसरातील त्याच्या वावराच्या अनेक घटना अलीकडे पुढे आल्या आहेत. 

शिराळा आणि वाळवा तालुक्‍यांच्या सीमाभागातील उसाच्या फडात किंवा महामार्ग पार करताना दोन वेळा बिबटे मृत्युमुखी पडले. त्याचवेळी माणसांसोबतच्या संघर्षाच्या घटनाही आहेत. बिबट्यांसोबतच्या सहअस्तित्वाचा तोल सांभाळतच यापुढे माणसांना पुढे जावे लागेल. सागरेश्‍वरला आलेला बिबट्या मादी जातीचा आहे. त्याची पैदास झाली तर ही संख्या वाढू शकते. सागरेश्‍वरात दिसलेल्या बिबट्याच्या निमित्ताने यापुढे नागरिक-ग्रामस्थांचं वर्तन काय असलं पाहिजे, या अनुषंगाने वन्यप्रेमी, नागरिक आणि वनाधिकाऱ्यांच्या मतांचा घेतलेला हा कानोसा... 

बिबट्या माणसांना सरावतोय... 
सागरेश्‍वरला यापूर्वीही 2016 मध्ये बिबट्या दिसला होता. मच्छिंद्रगड किंवा कऱ्हाडकडील सह्याद्रीच्या रांगांमधून बिबटे शिरतात. या भागात ऊस फडांमध्ये त्यांचा अधिवास आहे. ऊसतोडीमुळे बिथरून ते दाट झाडीकडे वळतात. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्‍यात बिबट्यांची पैदासच आता उसाच्या फडांमध्ये होत आहे. त्यामुळे या बिबट्यांची ही प्रजाती आता जंगली म्हणता येणार नाही, असेही वन्य संशोधकांचे मत आहे. कदाचित हा उत्क्रांतीचा टप्पाही म्हणता येईल. कारण आपल्याकडेही शिराळा व वाळवा तालुक्‍यातील उसाच्या शिवारांमध्ये बछडे आढळत आहेत. त्यांच्या अधिवासात, राहणीमानात झालेले हे बदल आता माणसांनी समजून घेतले पाहिजेत. बिबट्यांचं अस्तित्व सागरेश्‍वरसारख्या वनाचा भाग आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. 
- अजित (पापा) पाटील, वन्यप्रेमी कार्यकर्ते 

भीती नको, आम्ही काळजी घेऊ 
मानवनिर्मित सागरेश्‍वर अभयारण्याची समृद्धीच बिबट्या आणि गव्यांच्या अस्तित्वामुळे वाढली आहे. त्यांचा मानवी वस्तीला त्रास होणार नाही, यासाठी आम्ही पुरेपूर दक्षता घेऊ. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये. बिबट्या प्रवेशद्वाराकडील बाजूनेच आला असावा. कारण त्याचे ठसे दिसले आहेत. सध्याही त्याचा वावर विश्रामगृहाच्या परिसरातच आहे. बछडेही आहेत. त्याच्यासाठी अन्नाची मुबलक सोय असल्याने ते इथेच राहतील. अभयारण्याच्या कुंपण भिंतीचे उर्वरित पाच ते सहा किलोमीटरचे काम आम्ही लवकरच पूर्ण करू. यापुढे अभयारण्यात दुचाकीने, पायी कोणालाही सोडले जाणार नाही. भटकंतीसाठी चारचाकी वाहनाची लवकरच सोय केली जाईल. अभयारण्यात वावर दक्षतेचा असला पाहिजे. सर्वांनी दक्षता घ्यावी. 
- अनिल जेरे, सहायक वनसंरक्षक, राधानगरी-सागरेश्‍वर 

वन विभागाने शंकांचे निरसन करावे 
सागरेश्‍वरमध्ये याआधी कधीच बिबटे दिसलेले नाहीत. कडेगाव तालुक्‍यातील आसदकडील अभयारण्याचा भाग बंदिस्त नाही. तिथून डोंगरकपारीतून बिबट्या आला असावा. परिसरात मात्र सध्या वेगळीच चर्चा आहे. बिबट्या बछड्यांसह आणून सोडला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. त्याचे निरसन वनाधिकाऱ्यांनी करायला हवे. अभयारण्याच्या आजूबाजूला असलेल्या शिवारांत आता फिरणेही अवघड होईल. बिबट्यांपासून हानी होणार नाही, याबाबत वन विभागाने तातडीने कार्यवाही केली पाहिजे. 
- विक्रम शिरतोडे, ग्रामस्थ, देवराष्ट्रे 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT