Bhai Birthday
Bhai Birthday 
पश्चिम महाराष्ट्र

भाईचा बर्थ डे... वाजले तीन-तेरा!

सकाळवृत्तसेवा

नागठाणे - ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील गाण्याची सध्या युवा वर्गात मोठी ‘क्रेझ’ आहे. त्याचाच कित्ता गिरवू पाहाणाऱ्या येथील ‘बर्थ डे बॉईज’चे पोलिसांनी मात्र तीन-तेरा वाजवले!

‘मुळशी पॅटर्न’मधल्या पिट्याभाईच्या वाढदिवसाचे जल्लोषी वातावरण सध्या युवकांना भुरळ पाडताना दिसते. येथे त्याच मार्गाने असे ‘बर्थ डे सेलिब्रेशन’ करणे मात्र युवकांच्या चांगलेच अंगलट आले. गावातील तीन वेगवेगळ्या गटांतील अल्पवयीन मुलांच्या वाढदिवसाचे निमित्त होते.

जोशात असणाऱ्या ‘बर्थ डे बॉईज’च्या अनुयायांनी प्रथम रस्त्यातच केक कापला. त्यानंतर तिन्ही गटांत जल्लोष साजरा करण्याची जणू अहमहमिका सुरू झाली. काही उत्साही युवकांनी गाड्यांचे हॉर्न कर्णकर्कश्‍यपणे वाजवायला सुरवात केली. काहींनी फटाक्‍यांची आतषबाजी सुरू केली. त्याची झळ सामान्य नागरिकांना बसू लागली.

याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर सुरू असलेल्या मिरवणुकीत सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, सहायक फौजदार संजय दिघे, प्रशांत महाडिक, किरण निकम, स्वप्नील माने, समाधान राक्षे, वैभव डांगरे या पोलिसांनी दमदार ‘एन्ट्री’ केली. या वेळी मिरवणुकीत सामील झालेल्या अनेक चाहत्यांना केकऐवजी पोलिसांच्या दंडुक्‍याचा ‘प्रसाद’ मिळाला. केवळ यावरच हे ‘सेलिब्रेशन’ थांबले नाही. सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांनी तिन्ही ‘बर्थ डे बॉईज’ची वरात लवाजम्यासह थेट बोरगाव पोलिस ठाण्यात आणली. आठ युवकांवर मुंबई पोलिस ॲक्‍टनुसार कारवाई करण्यात आली. एक चारचाकी तसेच दोन दुचाकींवरही दंडात्मक कारवाई केली गेली. या प्रकरणावर कसाबसा पडदा पडला खरा. मात्र, ‘बर्थ डे बॉईज’ अन्‌ त्यांच्या चाहत्यांना मिळालेल्या पोलिसी ‘प्रसादाची’ खमंग चर्चा दिवसभर गावात सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT