Bhondubaba arrested in Kolpewadi 
पश्चिम महाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखविणारा भोंदूबाबा गजाआड 

मनोज जोशी

कोपरगाव : लग्न जमविण्यासाठी महिलांना फसविणारा आणि अंधश्रद्धा पसरवणारा भोंदूबाबा मल्लिअप्पा ठकाजी कोळपे (वय 35, रा. कोळपेवाडी) याच्यासह दोघांना पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या मदतीने आज पोलिसांनी अटक केली. मल्लिअप्पा चिखली (ता. संगमनेर) येथे एका घरात घरबंधन विधी करत असताना "स्टिंग ऑपरेशन' राबवून ही कारवाई करण्यात आली. या भोंदूबाबाने लग्न जमवून देण्याच्या आमिषाने अनेक महिलांना वाममार्गाला लावल्याची माहिती उघड होत आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील सहा चारी परिसरात राहणारा मल्लिअप्पा तालुक्‍यासह राज्यातील अनेक पीडित कुटुंबांना, महिलांना भोंदूगिरी करून वाममार्गाला लावत असल्याच्या तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आल्या होत्या. समितीच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे व कार्यकर्त्यांनी वेश बदलून बाबाशी संपर्क साधला आणि "स्टिंग ऑपरेशन' घडवून आणले. "चिखली येथील एकाची आई आणि जनावरेही आजारी पडतात, मुलाचे लग्न जमत नाही,' असे खोटे सांगून मल्लिअप्पाला बोलावले. त्याने "घरबंधन विधी करावा लागेल आणि त्यास सात हजार रुपये खर्च येईल,' असे सांगितले. त्यानुसार आज विधी करण्यात येणार होता. 

हे वाचा सत्तेचा ताळमेळ अन्‌ नगरची भेळ 

दरम्यान, गवांदे यांनी पोलिस उपअधीक्षक वसंत पंडित व निरीक्षक अभय परमार यांच्याशी संपर्क साधून पोलिसांची कुमक मागविली. चिखली येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास पूजाविधी सुरू असताना साध्या वेशातील पोलिसांनी मल्लिअप्पाला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या चांगदेव शिवाजी चिने (रा. पाथरे, ता. सिन्नर, जि. नाशिक) यालाही पोलिसांनी अटक केली. मल्लिअप्पाने लग्न जुळविण्याच्या आमिषाने अनेक कुटुंबांना फसविल्याची समोर आली आहे. 

भोंदूबाबाकडे जाणारेही दोषी 
""खरे तर राज्यात 2013मध्ये अंधश्रद्धा- जादूटोणाविरोधी कायदा अमलात आला. "अंनिस'ने राज्यात प्रचारदौरे करून प्रबोधन केले, तरीही भोंदूगिरी सुरू आहे. याबाबत 500 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मात्र, भोंदूबाबाकडे जाणारेदेखील तितकेच दोषी आहेत.'' 
- ऍड. रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT