broke bridge  
पश्चिम महाराष्ट्र

येरळा नदीवरील पुलाला मोठे भगदाड 

सकाळ वृत्तसेवा

सातारा: 
अंबवडे - गोरेगाव रस्त्यावर स्थिती;नूतनीकरणाची आग्रही मागणी 
अंबवडे - गोरेगाव रस्त्यादरम्यान येरळा नदीपात्रावरील पीळ पूर्व बाजूने पूर्णपणे खचला गेल्याने पुलास आरपार मोठे भगदाड पडले आहे.परिणामी पूल पूर्णपणे धोकादायक बनलेला आहे.तेव्हा या पुलाचे तातडीने नूतनीकरण करावे,अशी मागणी आंबवडे ग्रामपंचायतीच्या सदस्य ज्ञानेश्वर ईंगवले यांनी तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  • जुना पूल पडून नवीन पूल करावा 
  • ग्रामस्थांसह विध्यार्थी,शेतकऱ्यांची मागणी 
  • धोकादायक पूल,ठिकठिकाणी पुलाला भेगा 

"साखर कारखानदारी टिकवण्याचे आवाहन 
आंबवडे ते गोरेगाव या मार्गाने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.शेतकरी, विध्यार्थी,प्रवासी,स्कुल बस या रस्त्यावरून मायानी येथे जातात.पावसाळ्यात हा आपुला १ ते २ महिने येरळा नदीच्या पाण्याखाली जातो. त्यावेळी या रस्त्याची वाहतूक पूर्णपणे बंद असते. या पुलावरील पाण्यातून शेतकरी,शाळेतील मूले ये-जा करतात.त्यावेळी सर्वांची गैरसोय होते. तेव्हा या पुलाचे तातडीने नूतनीकरण करून विद्यार्थी व ग्रामस्थांची सोया करावी,असे निवेदन श्री ईंगवाले यांच्यासह ग्रामस्थ,विद्यार्थी,शेतकरी यांनी तहसीलदारांना दिले आहे. 


या पुलामुळे होणाऱ्या गैरसोईचा प्रकार वेळच्यावेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे.परंतु हा प्रश्न कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही.संभाव्य धोक्याच्या गाम्भीर्यने घेताना दिसत नाही.त्या धोक्याचा विचार करून नवीन पूल बांधण्यासाठी पावले उचलावीत,अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

"प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल".वेळप्रसंगी उग्र आंदोलन करावे लागेल अशी संतप्त प्रतिकिया ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ईंगवले यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT