Bison came to Vishrambag ... An atmosphere of fear among the citizens 
पश्चिम महाराष्ट्र

विश्रामबागमध्ये आला गवा... नागरिकांत भीतीचे वातावरण

शैलेश पेटकर

सांगली : हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गव्हर्मेंट कॉलनीनजीकच्या गजराज कॉलनीत आज रात्री महाकाय गवा दिसला आणि नागरिकांची तारांबळ उडाली. काही वेळातच तेथील रस्त्यावरची वर्दळ गायब झाली. त्यानंतर बराचवेळ गवा एकटाच त्या रस्त्यावर वावरत होता. बावरलेल्या गव्याला नेमके कोणत्या दिशेला जायचे, हे उमगत नसावे. कारण ते धष्टपुष्ठ जनावर रस्त्याकडेच्या घरांच्या गेटजवळ जाऊन पुन्हा परतून मार्ग बदलत होते. अखेर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो गवा तेथील कुंभार मळ्याच्या बाजूला अंधारात गायब झाला. 

सांगलीत सुमारे बावीस वर्षांपूर्वी आलेल्या गव्याने अनेकांची तारांबळ उडवून दिली होती. मिरज रोडकडून सांगलीकडे येताना त्या गव्याने हॉटेल सदानंद नजीकच्या कंपाऊंडच्या भिंतीला धडक दिली होती. त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील रिकाम्या जागेतील काटेरी झाडीत शिरला होता. त्या ठिकाणी त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते.

अगदी मुंबईतील डॉक्‍टरांनाही पाचारण करण्यात आले होते. परंतु काटेरी झाडीचा परिसर मोठा होता, शिवाय तो गवा अधूनमधून कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न करत आक्रमक झाला होता. बऱ्याच उशीराने गवा पकडण्यात आला. परंतु त्याला दाजीपूरच्या अभयारण्यात नेऊपर्यंत वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.

त्याच्या मृत्यूला अनेक कारणांबरोबरच स्थानिकांची हुल्लडबाजीही कारणीभूत ठरली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी एक गवा शहरातील टिळक स्मारक परिसरात अचानकच दिसला होता. ही घटना रात्रीची होती. टिळक स्मारकापासून पांजरपोळ मार्गे तो गवा कृष्णा नदीच्या काठावरुन शेरीनाल्याच्या दिशेने जावून गायब झाला होता. 

रविवारी रात्री गव्हर्मेंट कॉलनीनजीकच्या गजराज कॉलनीत आढळलेला गवा बराचवेळ रस्त्यावरुन वावरत होता. याचे चित्रण अनेकांनी मोबाईलमध्ये केले. याची माहिती मिळताच प्राणी मित्र मुस्तफा मुजावर, ऍनिमल राहतचे किरण नाईक हे तत्काळ त्या परिसरात पोहचले. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही धावत आले. तोपर्यंत गव्याने गजराज कॉलनीतून कुंभार मळ्याच्या दिशेने मार्गक्रमण केले होते. व्हिडिओतील दृश्‍यांच्या आधारे तो गवा रेडाच होता, अशी ग्वाही वनविभागाने दिली आहे. 

रात्री उशीरापर्यंत्त शोध
विश्रामबाग परिसरात शिरलेल्या या गव्याचा रात्री उशीरापर्यंत्त शोध घेऊन तो सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात जावा, यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु होते. 
- प्रमोद धाणके, विभागीय वनाधिकारी 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT