ganapati patil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बिसूरचे ग. रा. पाटील वापरतात 48 वर्षे घरच्या बॅंकेतील बियाणे 

सकाळवृत्तसेवा

सांगली-  मिरज तालुक्‍यातील बिसूरचे ग. रा. तथा गणपती रामचंद्र पाटील. 77 वर्षांची ही आसमी. गेली 48 वर्षे घरचंच बियाणं वापरतात.

दरवर्षी पिकणाऱ्या धान्यातून बी म्हणून निवडक कणसं बाजूला काढतात. पारंपरिक पद्धतीने कणगीत राखेच्या सहाय्याने त्याची जपणूक करतात. त्यांची ही बियाणे बॅंक यंदा 48 वर्षांची झाली. शालेय शिक्षणात इयत्ता आठवी नापास, पण व्यावहारिक जगात पीएचडी म्हणता येईल असे हे रांगडं व्यक्तीमत्व. त्यांचं वय 77 वर्षे. पत्नी सावित्री 74 च्या. दोघंही मातीशी इमान राखणारे.

पाटील आठवी नापास. शिक्षकाने अपमान केला म्हणून शाळेकडे परत फिरकले नाहीत. शेतीशाळेचे ते मास्तर झाले. साडे आठ एकर शेतीत ते ज्वारी (हायब्रीड व शाळू), हरभरा, गहू, गाजर, भुईमुग, ऊस पिकवतात. घरच्या बियाणांचाच वापर हे त्यांचं वैशिष्ट्य. शाळूसह अन्य कडधान्याचं बियाणं ते घरीच तयार करतात. सन 1972 च्या दुष्काळात आणलेल्या बियाणाच्या पिशवीतून पिकलेलं धान्यच ते बियाणं म्हणून आजतागायत वापरत आहेत. कणसं निवडून बियाणांची जुळणी करायची. बीज प्रक्रियेचं काम सावित्री करतात. बियाणांसाठी वापरली जाणारी कणगीही साधारण 50-60 वर्षापेक्षा जास्त काळापासून त्यांची सोबती आहे. 

आठवडा बाजारात विक्री-एकरी पाच किलो बियाणं वापरून सरासरी 8 ते 10 पोती उत्पन्न घेतात. सांगली, बुधगाव, माधवनगरसह परिसरातील बाजारात किरकोळ पद्धतीने विक्री करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT